माजी आमदार अशोकदादा काळे

माजी आमदार अशोकदादा काळे यांनी त्यांचे वडील माजी खासदार स्वर्गीय कर्मवीर शंकररावजी काळे साहेब यांचा समाजकारणाचा वसा पुढे चालवत तालुक्याच्या विकासात मोठ्या प्रमाणात योगदान दिले. सर्वसामान्य जनतेच्या उत्कर्षासाठी काम करण्याची त्यांची बांधिलकी बघून जनतेने त्यांना २ वेळा आमदार होण्याची संधी दिली. सन २००४ ते २०१४ मध्ये कोपरगाव तालुक्याचे आमदार राहिले.कोपरगाव तालुक्याचा विकास साधतांना कोपरगाव शहर आणि तालुक्याचा ग्रामीण भाग एकमेकाना जोडून कसा विकास साधता येईल या विचारातून माजी आमदार अशोकराव काळे यांनी आपल्या आमदारकीच्या कारकिर्दीत अनेक वर्षापासून प्रलंबित असेलेले गोदावरी नदीवरील पुलांचे काम पूर्ण करून कोपरगाव तालुक्यातील ग्रामीण भाग शहराला जोडून फक्त कोपरगाव शहराची बाजारपेठच फुलविली नाही तर शहर आणि ग्रामीण भागातील माणूस एकमेकाना जोडण्याचे म्हत्वपूर्ण काम केले आहे.

कोपरगाव येथे जाण्यासाठी तालुक्याच्या पश्चिम भागातील गावांतील जनतेला पावसाळ्यात आपली कोपरगाव शहरातील कामे जवळपास बंदच ठेवावी लागत असे. कारण पावसाळ्यात गोदावरी नदीला पाणी असल्यास चासनळी, देर्डे चांदवड व धारणगाव कुंभारी येथील गोदावरी नदी पार करून जावे लागत असे. परंतु नदीला पाणी असल्यास हे मार्ग कायमस्वरूपी बंद राहत असे. याचा परिणाम कोपरगाव शहरातील बाजारपेठ ओस पडत असे. हि अडचण लक्षात घेवून माजी आमदार अशोकदादा काळे यानी कोपरगाव तालुक्यात विविध ठिकाणी गोदावरी नदीवर पूल बांधून जनतेची अडचण दूर करीत कोपरगावची बाजारपेठ फुलविण्याचे काम केले.

यामध्ये कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथील पूल, धारणगाव – कुंभारी येथील गोदावरी नदीवरील पूल, वारी येथील गोदावरी नदीवरील पूल, कोपरगाव शहरातील अहमदनगर मनमाड महामार्गावरील समांतर पूल, कोपरगाव शहर आणि बेट भागाला जोडणारा पूल.

ब्रिटीशांच्या काळात बांधलेले तहसील कार्यालय या कार्यालयात ठेवलेले कैदी अनेकवेळा या इमारतीतून पोलिसांच्या हातावर तुरी देवून पसार झाले हि अडचण ओळखून तहसील कार्यालयाची जुनी इमारत पाडून नवीन तहसील संकुलाचे काम पूर्ण केले. कोपरगाव न्यायालयाच्या नवीन सुसज्ज इमारतीचे काम, कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाची इमारत, पशु चिकित्सालयाच्या इमारतीचे काम तसेच कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाण्याच्या माध्यमातून गोदावरी कालवे व चा-यांची दुरुस्ती त्यांनी केली.

पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी पुर्वेकडे वळविण्यासाठी तसेच गोदावरी कालव्यांचे नूतनीकरण व निळवंडे कालवे होण्यासाठी तसेच बारमाही ब्लॉकचे क्षेत्र कायन ठेवून हक्काचे ११ व सध्याचे १३ टीएमसी पाणी मिळविण्यासाठी न्यायालयीन लढाई अंतिम टप्यात आहे.

Facebook

Instagram