कामगार सेवेतून निवृत्त परंतू उद्योग समूहाच्या ऋणानुबंधनातून कधीही निवृत्त होणार नाही - आशुतोष काळे

माजी खासदार स्व.शंकररावजी काळे साहेबांनी नेहमीच सभासद व कामगारांना केंद्र स्थानी ठेवून त्यांच्यावर भरभरून प्रेम केले. माजी आमदार अशोकदादा काळे यांनी स्व. साहेबांची परंपरा जोपासली. त्यांनी कामगारांच्या सुखदुख:त सहभागी होऊन कामगारांच्या अडचणी सोडविन्याला नेहमी प्राधान्य दिले. त्यांच्याच विचारांचा वसा व वारसा जोपासत असतांना मलाही प्रेम व सहकार्य मिळाले. हे माझे भाग्य असून आज कर्मवीर शंकरराव काळे उद्योग समूहातून निवृत्त होणारे कर्मचारी जरी शासन नियमाप्रमाणे निवृत्त होत असतील परंतू कर्मवीर शंकरराव काळे उद्योग समूहाच्या ऋणानुबंधनातून कधीही निवृत्त होऊ शकणार नाही असे प्रतिपादन कर्मवीर शंकराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते आशुतोष काळे यांनी केले. माजी आमदार अशोकराव काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या कर्मवीर शंकराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या ३१ व आसवनी विभागाच्या १२ अशा एकून ४३ कामगारांच्या सपत्नीक सेवा निवृत्ती कार्यक्रमात आपल्या अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते. ते पुढे म्हनाले की, कर्मवीर शंकरराव काळे उद्योग समूह हे एक कुटुंब असून कुटुंबातील सभासद व कामगार हे महत्वाचे घटक आहे.सभासद आणि कामगारांनी नेहमीच कारखान्यावर आणि स्व.काळे साहेबांवर प्रेम केले.अडचणीच्या काळातही कामगारांनी मोलाचे सहकार्य केले. कामगारांनी जे प्रेम स्व.काळे साहेबांना आणि माजी आमदार अशोक दादांना दिले तेच प्रेम भविष्यात माझ्यावरही अबाधित रहावे अशी अपेक्षा युवा नेते आशुतोष काळे यांनी व्यक्त केली. यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष सूर्यभान कोळपे, संचालक ज्ञानदेव मांजरे, सचिन रोहमारे, विठ्ठलराव आसने, सर्जेराव कोकाटे, आनंदराव चव्हाण, सुनील शिंदे, राजेंद्र घुमरे, हरिभाऊ शिंदे, सौ. सुनंदा राशिनकर, अशोकमामा काळे, कामगार संचालक रामचंद्र भारसाकळ, अरुण पानगव्हाने, पंचायत समिती सदस्य श्रावण आसने तसेच कारखान्याचे कार्यकारी संचालक गिरीश जगताप,आसवनी विभागाचे जनरल मॅनेजर जयंतराव भिडे,जनरल मॅनेजर ए. व्ही. काळे, सेक्रेटरी सुनील कोल्हे,ऑफिस सुपरिटेंडेंट बाबा सय्यद विविध खात्यांचे प्रमुख पदाधिकारी यांचेसह माजी कामगार मोठ्या संख्येने आपल्या परिवारासह उपस्थित होते. उपस्थितांचे प्रास्तविक व स्वागत कारखान्याचे सेक्रेटरी सुनील कोल्हे यांनी केले तर सूत्रसंचालन संचालक अरुणराव चंद्रे यांनी केले. आभार कारखान्याचे उपाध्यक्ष सूर्यभान कोळपे यांनी मानले.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram