आशुतोष काळे यांचा वाढदिवस वृक्षारोपण, रक्तदान शिबीर आदी सामाजिक उपक्रम राबवून साजरा

कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे युवा नेते आशुतोष काळे यांचा वाढदिवस वृक्षारोपण, रक्तदान शिबीर, विद्यार्थ्यांची रक्त गट तपासणी अशा प्रकारे विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. मागील वर्षी कोपरगाव तालुक्यात गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे आशुतोष काळे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त साजरे करण्यात येणारे सर्व कार्यक्रम रद्द करून कोपरगाव शहरात पुराच्या पाण्याने रोगराई निर्माण होऊ नये यासाठी स्वच्छता मोहीम हाती घेतली होती. त्यांच्या सामाजिक विचारांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तसेच, कर्मवीर प्रतिष्ठाण, आशुतोष दादा रयत विचार मंच, प्रेरणा फौंडेशन, बजरंग चौक मित्रमंडळ तसेच आशुतोष दादा फौंडेशनच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये कारखाना कार्यस्थळावरील रयत शिक्षण संस्थेच्या शैक्षणिक संकुलातील श्री. छत्रपती संभाजी विद्यालयातील एकून एक हजार चारशे विद्यार्थी –विद्यार्थिनीना पर्यावरणाचा समतोल राखला जावा यासाठी विविध प्रकारच्या वृक्षांचे युवा नेते आशुतोष काळे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या वतीने गौतम पब्लिक स्कूल मध्येही वाढदिवसाचे नियोजन करण्यात आले होते. तसेच कोपरगाव तालुका राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष वतीने चारुदत्त सिनगर यांच्या वतीने सौ. सुशीलामाई काळे माध्यमिक विद्यालय भोजडे व भोजडे प्राथमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना एक हजार वह्यांचे वाटप करण्यात आले. कोपरगाव शहरातही वाढदिवसानिमित्त अजीज शेख व त्यांच्या कार्यकर्त्यांनी अमरधाम येथे स्वच्छता मोहीम राबवून अमरधाम स्वच्छ करण्यात आला. कर्मवीर प्रतिष्ठानच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहातील विद्यार्थ्यांना मिष्ठान्न भोजन, माधवराव आढाव शाळेतील विद्यार्थ्यांना खेळाचे साहित्य वाटप, तसेच लायन्स मूक बधीर विद्यालयातील विद्यार्थ्यांना आशुतोष दादा रयत विचार मंचच्या वतीने मिष्टान्न भोजन दिले. कोपरगाव नगरपालिकेच्या प्राथमिक शाळेतील सुमारे एक हजार विद्यार्थ्यांचे दंत स्पेशालीस्ट डॉ. कुणाल घायतडकर व सौ. भाग्यश्री घायतडकर यांनी दंत तपासणी करून उपचार केले. शाळा क्रमांक एक मधील आर्थिक दृष्ट्या दुर्बल आसना-या विद्यार्थ्यांना बजरंग चौक कायकर्ते बाला गंगुले यांनी गणवेश वाटप केले. चक्रधर स्वामी विद्यालय प्राथमिक व माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना वह्या वाटप तसेच येवला रोड वरील मस्जिद मध्ये मुस्लीम बांधवाना बसण्यासाठी फकीर मामु कुरेशी यांनी सीमेत बाके दिली. कर्मवीर प्रतिष्ठानच्या वतीने घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरामध्ये युवकांनी रक्तदान केले. तसेच आशुतोष काळे यांच्या वाढदिवसाचे औचीत्य साधत कोपरगाव तालुक्यातील सर्वच माध्यमिक शाळांमधील इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांचे रक्तगट तपासणी शिबीर सुरु करण्यात आले असून रवंदे व व टाकळी येथील शाळेच्या विद्यार्थ्यांची रक्तगट तपासणी पूर्ण झाली आहे. अशा प्रकारे सामाजिक बांधिलकी जोपासत राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी व विविध सामाजिक संस्थांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आशुतोष काळे यांचा वाढदिवस सामजिक उपक्रम राबवूनच साजरा केला.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram