आशुतोष काळे यांचे भविष्य उज्वल – नगराध्यक्ष वहाडणे

कोपरगाव नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी विराजमान झाल्यांनतर मला नूतन नगरसेवकांचे सहकार्य मिळेल का नाही आणी मिळालेच तर ते सहकार्य कशा प्रकारचे असेल अशी मनात साशंकता असतांना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे युवा नेते आशुतोष काळे यांनी सर्वप्रथम राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने विकास कामांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे व जाहीर पाठिंबा दिला त्याचवेळी मला आशुतोष काळे हे विकासाच्या बाबतीत कधीही कुठेही राजकारण करणारे व्यक्तिमत्व नसून विकासकामांना सकारात्मक प्रतिसाद देणारे नेतृत्व असल्याचे मी मनोमन जाणले. त्यांची सुरु असलेली वाटचाल योग्य असून आशुतोष काळे यांचे भविष्य उज्वल असल्याचे गौरवोदगार कोपरगाव नगर परिषदेचे नगराध्यक्ष विजयराव वहाडणे यांनी कोपरगाव येथे आशुतोष काळे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित अभिष्टचिंतन सोहळा कार्यक्रम प्रसंगी केले. कोपरगाव येथे कर्मवीर शंकरराव काळे सहकारी कारखान्याचे अध्यक्ष व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे युवा नेते आशुतोष काळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतांना आपले मनोगत व्यक्त करतांना ते पुढे म्हणाले की, माजी खासदार स्व. कर्मवीर शंकररावजी काळे व माजी खासदार स्व. सुर्यभानजी वहाडणे यांचे राजकारणापलीकडचे अतिशय जिव्हाळ्याचे कौंटुंबिक संबंध होते. आशुतोष काळे यांनी स्व. काळे साहेवांचा व माजी आमदार अशोकराव काळे यांचा समाजकारणाचा वारसा समर्थपणे पुढे चालवीत आहे. दिलेला शब्द पाळणारा नेता, ज्याच्या सोबत राहील त्यालाच मनापासून साथ देणार अशी त्यांची संपूर्ण कोपरगाव तालुक्यात वेगळी ओळख निर्माण झाली असून त्यांचे भविष्य खरोखर उज्वल असल्याचे सांगितले. यावेळी आशुतोष काळे सत्काराला उत्तर देतांना म्हणाले की, विकास कामात राजकारण आणायचे नाही हा कुटुंबाकडून मिळालेला वारसा जोपासत आजपर्यंत कधीही विकास कामात राजकारण केले नाही व करणार नसल्याचे सांगत यापुढेही कोपरगाव शहर व तालुक्याचे विकास कामांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेश सचिव संदीप वर्पे, जिल्हा उपाध्यक्ष दीपक साळुंके,शहराध्यक्ष सुनील गांगुले,नगरसेवक गटनेते विरेन बोरावके, नगरसेवक,संदीप पगारे,मंदार पहाडे, राजेंद्र वाघचौरे, सुनील शिलेदार , अजीज शेख , सतीश कृष्णानी, विनायक गायकवाड, प्रा. वडांगळे, संजय कांबळे, मनोहर कृष्णाणी, आदी मान्यवर उपस्थित होते

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram