जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या योजनांचा फायदा समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचविणार – आशुतोष काळे

जिल्हा परिषद व पंचायत समिती हे ग्रामीण भागाच्या विकासाचे प्रमुख केंद्र स्थान आहे.आजवर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या योजनांचा फायदा समाजातील मोजक्याच व्यक्तींना मिळत होता. योजनांचा लाभ हा शेवटच्या घटकांपर्यंत कधीच पोहोचलाच नाही. परंतु आता यापुढे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या ज्या काही योजना असतील त्या प्रत्येक योजनांचा लाभ हा त्या योजनेच्या शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचविणार असल्याचे प्रतिपादन कर्मवीर शंकरराव काळे सहकारी कारखान्याचे चेअरमन युवा नेते आशुतोष काळे यांनी केले. जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून लाभार्थ्यांना कडबा कुट्टी मशीन व इलेक्ट्रिक मोटार, पाईप व साहित्याचे वाटप प्रसंगी ते बोलत होते. जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून विविध योजना राबविल्या जातात.त्या योजनांच्या माध्यमातून अनुसूचित जाती,जमातीच्या दारिद्र्य रेषेखालील शेतकरी कुटुंबांना कडबा कुट्टी मशीन व इलेक्ट्रिक मोटार १०० टक्के अनुदानातून दिल्या जातात. समाज कल्याण विभागाने १४ शेतक-यांची कडबा कुट्टी मशीन व इलेक्ट्रिक मोटारचे लाभार्थी म्हणून निवड केली होती. या लाभार्थ्यांना युवा नेते आशुतोष काळे यांच्या हस्ते कडबा कुट्टी मशीन व इलेक्ट्रिक मोटारचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी पंचायत समितीच्या सभापती सौ. अनुसयाताई होन, उपसभापती अनिल कदम, जिल्हा परिषद सदस्य सुधाकर दंडवते, पंचायत समिती सदस्य मधुकर टेके, अर्जुनराव काळे, अजीज शेख, प्रसाद साबळे, नानासाहेब कदम, समाज कल्याण अधिकारी बाविस्कर व लाभार्थी उपस्थित होते.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram