कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी संपर्क कार्यालय – आशुतोष काळे

कोपरगाव विधान सभा मतदार संघामध्ये राहाता तालुक्यातील ११ गावे नव्याने समाविष्ट करण्यात आली. त्यावेळी या ११ गावातील जनतेने माजी आमदार अशोकराव काळे यांना भरघोस मतांनी निवडून दिले. या ऋणातून उतराई होण्यासाठी आमदार अशोकराव काळे यांनी या ११ गावांना जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देवून जास्तीत जास्त विकास कामे केली. परंतु केलेल्या विकास कामांची कधीही जाहिरात केली नाही. आज कोपरगाव विधानसभा मतदार संघातील रस्त्यांची अवस्था अतिशय वाईट आहे. तालुक्याच्या लोकप्रतिनिधीं फक्त स्थानिक विकास निधीतून हायमੱक्स व स्मशान भूमीचे शेड यापलीकडे कोणतेही कामे करीत नाहीत. त्यामुळे नागरिकांचे समस्या वाढल्या आहेत. नागरिकांचे ज्वलंत प्रश्न व समस्या सोडविण्यासाठी व कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी संपर्क कार्यालय स्थापन केले असल्याचे कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे युवा नेते आशुतोष काळे यांनी राहाता संपर्क कार्यालयाच्या उदघाटन प्रसंगी केले. शिर्डी, राहाता तालुक्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या विविध अडचणी सोडविण्यासाठी संपर्क कार्यालय सुरु करण्यात आले असून या संपर्क कार्यालयाचे उदघाटन युवा नेते आशुतोष काळे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी राहाता तालुक्यातील राष्ट्रवादी सेल अध्यक्षांना निवडीचे पत्र त्यांच्या व राष्ट्रवादी कॉंग्रेस पदाधिका-यांच्या हस्ते देण्यात आले. यामध्ये दिलीपराव चौधरी किसान सेल अध्यक्ष, अण्णासाहेब कोते वक्ता प्रशिक्षण सेल अध्यक्ष, विजयराव गडाख सोशल मेडिया अध्यक्ष, दीपक वाघ सहकार सेल अध्यक्ष, मुरलीधर शेळके जेष्ठ नागरिक सेल अध्यक्ष, सुनील थोरात ओबीसी सेल अध्यक्ष, विनायक देठे विद्यार्थी सेल अध्यक्ष, तसेच राहाता तालुका युवक सेल अध्यक्षपदी आनंद शहा व शायद सय्यद यांची अल्पसंख्यांक सेल अध्यक्षपदी निवड करण्यात आली. यावेळी ५० ते ६० युवकांनी आशुतोष काळे यांचे उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस चे राहाता तालुका अध्यक्ष सुधीर म्हस्के, काळे कारखान्याचे उपाध्यक्ष सूर्यभान कोळपे, संचालक आनंदराव चव्हाण, बाळसाहेब, बारहाते, जी.प. सदस्य सुधाकर दंडवते, सुधाकर रोहोम, विठ्ठलराव आसने, अशोक काळे, गौतम बँकेचे चेअरमन बाबासाहेब कोते. शिर्डी शहराध्यक्ष महेंद्र शेळके, माजी उपनगराध्यक्ष निलेश कोते. राजेंद्र पोतदार युवक जिल्हा उपाध्यक्ष, रमेश गोंदकर, अमित शेळके, सर्जेराव जाधव, मुरलीधर थोरात, तुकाराम वहाडणे, डॉ. गुंजाळ, मुरलीधर शेळके माउली काळे,अनिल कोते,सुनील थोरात, सोपानराव गिधाड, सुनील आरणे, बाळासाहेब वर्पे, सुनील थोरात, सौ. मंदा थोरात, सौ.अलका थोरात, आदी मान्यवरांसह राहाता तालुक्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस शशिकांत लोळगे यांनी केले तर आभार शहराध्यक्ष नंदकुमार सदाफळ यांनी आभार मानले.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram