माजी आमदार अशोकराव काळे यांच्या वाढदिवसा निमित्त वृक्षारोपण व रक्तदान शिबीर कार्यक्रम संपन्न

कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या सौ. सुशीलामाई काळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय व अर्पण रक्त पेढी संगमनेर यांच्या संयुक्त विद्यमाने सालाबाद प्रमाणे याहीवर्षी संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार अशोकराव काळे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. या रक्तदान शिबिराचे उदघाटन संस्थेच्या मानद सचिव सौ. चैताली काळे यांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये एकून ५६ रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी सौ. चैताली काळे यांनी रक्तदानाचे महत्व विषद करतांना त्या म्हणाल्या की, आपल्या संस्कृतीमध्ये दान करण्याला अनन्यसाधारण महत्व आहे. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. वेळप्रसंगी मानवाला आवश्यक असणा-या रक्ताची गरज फक्त आणि फक्त मानवच पूर्ण करू शकतो. आपण केलेल्या रक्तदानामुळे अनेकांना जीवनदान मिळू शकते याची जाणीव ठेवून युवकांनी रक्तदान शिबिरात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला पाहिजे. तसेच आजचे युग हे आधुनिक तंत्रज्ञानाचे युग असून युवा वर्गाने आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून नवनवीन ज्ञानशाखांच्या सतत संपर्कात राहून आपल्या ज्ञानामध्ये भर घालावी असा महत्वपूर्ण संदेश दिला. अर्पण रक्त पेढीच्या संचालिका श्रीमती कडलग व श्रीमती वाकचौरे यांनी रक्तदानाविषयी असलेले समज व गैरसमज याविषयी माहिती देवून विद्यार्थ्यांच्या शंकाचे निरसन केले. रक्तदान शिबिरामध्ये एकून ५६ विद्यार्थ्यांनी रक्तदान केले. तसेच गौतम पब्लिक स्कूल, सौ. सुशीलामाई काळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय तसेच गौतम पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट च्या परिसरात १५६ अशोक वृक्षांचे वृक्षारोपण संस्थेच्या मानद सचिव सौ. चैताली काळे यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी गौतम पब्लिक स्कूलचे प्राचार्य नूर शेख, सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका व विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram