जिल्हा नियोजन समितीवरही काळे पॅटर्न यशस्वी ३२ पैकी ४ सदस्य कोपरगाव तालुक्यातील

आशुतोष काळे यांनी आपले राजकीय कौशल्य वापरून समविचारी कॉंग्रेस पक्षाशी आघाडी करीत कोपरगाव तालुक्यात इतिहास घडवून पंचायत समितीची एकहाती सत्ता मिळवत जिल्हा परिषदेच्या चारही गटात निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करून चारही गटात विजय मिळविला होता. या ऐतिहासिक कामगिरीची दखल घेत काही दिवसापूर्वी अहमदनगर येथे माजी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते अजितदादा पवार यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना एका कार्यक्रमात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे युवा नेते आशुतोष काळे यांचे कौतुक करून यापुढे अहमदनगर जिल्ह्याने काळे पॅटर्न वापरावा असे सुतोवाच केले होते. त्यांनी केलेले सुतोवाच अतिशय सार्थ असल्याचे नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीत दिसून आले आहे. अहमदनगर जिल्हा परिषदेच्या एकून १३ तालुक्यातून निवडण्यात आलेल्या ३२ सदस्यांपैकी तब्बल चार सदस्य हे एकट्या कोपरगाव तालुक्यातील असून कोपरगाव तालुक्याच्या इतिहासात अशी किमया आजपर्यंत कुणाला जमली नाही, एवढेच काय पण कोपरगाव तालुक्यातील विरोधातील ज्या सत्ताधा-यांनी आजवर जिल्हा परिषद व पंचायत समितीची सत्ता उपभोगली त्यातील एकही सदस्य आजमितीला जिल्हा परिषदेच्या सत्तेत नाही. आशुतोष काळे यांच्या राजकीय कौशल्यामुळे कोपरगाव तालुक्याच्या ५५ वर्षाच्या इतिहासात प्रथमच कोल्हेचा एकही सदस्य जिल्हा परिषदेच्या सत्तेत नाही. जिल्हा नियोजन समितीची निवडणूक नुकतीच पार पडली यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे युवा नेते आशुतोष काळे यांच्या कुशल नेतृत्वातून कोपरगाव तालुक्यात यशस्वी ठरलेल्या काळे पॅटर्नचे राजेश परजणे, सुधाकर दंडवते, सौ. विमल आगवण व सौ. सोनाली साबळे यांची जिल्हा नियोजन समितीवर निवड झाली आहे. जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून विविध विकास कामे केली जातात. त्या विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून देणे ही जबादारी जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यांची असते. यामध्ये कोपरगाव तालुक्यातील चार सदस्य असल्यामुळे विकासकामांच्या बाबतीत कोपरगाव तालुक्यातील ग्रामपंचायतींना झुकते माप मिळणार असून याचे सर्व श्रेय हे आशुतोष काळे यांना जात आहे. त्यामुळे साहजिकच कोपरगाव तालुक्याच्या ग्रामीण भागाच्या विकासाला चालना मिळणार असून भविष्यात ग्रामीण भागाचा चेहरा मोहरा बदलणार आहे. यात कुठलीही शंका नाही. कोपरगाव तालुक्यात एकून जिल्हा परिषदेचे पाच गट असून न्यायलयीन आरक्षणाच्या मुद्यावरून न्यायलयीन प्रक्रियेत अडकलेल्या चांदेकसारे गटाच्या निवडणुकीतही काळे पॅटर्न यशस्वी होऊन यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस व राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाच्या सोनाली रोहमारे मोठे मताधिक्य घेवून नुकत्याच निवडणून आल्या आहेत. यदा कदाचित हि निवडणूक जर यापूर्वीच पार पडली असती तर कदाचित कोपरगाव तालुक्यातील पाच सदस्य जिल्हा नियोजन समितीवर निवडले गेले असते. एवढे यश या काळे पॅटर्नला व युवा नेते आशुतोष काळे यांच्या राजकीय कौशल्याला मिळाले आहे. अल्पावधीतच एवढे मोठे यश प्राप्त करून कोपरगाव विधानसभा -मतदार संघाला राष्ट्रवादी कॉंग्रेसचा हक्काचा मतदार संघ करण्यामध्ये युवा नेते आशुतोष काळे यांचे अतिशय मौलिक योगदान आहे. त्याबद्दल राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, आमदार दिलीपराव वळसे यांनी आशुतोष काळे यांचे अभिनंदन केले आहे.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram