गौतम सहकारी बँकेस जिल्हा सहकारी बँक्स असोसिएशनच्या वतीने पुरस्कार प्रदान

अहमदनगर जिल्हा सहकारी बँक्स असोसिएशनच्या वतीने विविध स्तरावरील प्रशिक्षण कार्यक्रमात सर्वाधिक प्रशिक्षणार्थी सहभागी केल्याबदल कोपरगाव तालुक्यातील गौतम सहकारी बँकेस पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले आहे. अहमदनगर जिल्हा सहकारी बँक्स असोसिएशनच्या वतीने दरवर्षी विविध उपक्रम राबविले जातात. या उपक्रमांमध्ये विशेष सहकार्य व उल्लेखनीय योगदान देणा-या सहकारी बँकेला विशेष पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येते. यावर्षी गौतम सहकारी बँकेला अहमदनगर जिल्हा सहकारी बँक्स असोसिएशनच्या वतीने प्रशिक्षण कार्यक्रमात सर्वाधिक प्रशिक्षणार्थी सहभागी केल्याबदल पुरस्कार व सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात आले आहे. हा पुरस्कार नुकताच गौतम सहकारी बँकेचे अध्यक्ष बाबासाहेब कोते यांना बँक बँक्स असोसिएशनचे अध्यक्ष रविंद्र लोहाडे यांच्या हस्ते व उपाध्यक्ष नाथा राऊत व कार्यलक्षी संचालक अशोक कुरापटी यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला. स्व. माजी खासदार शंकररावजी काळे यांनी ग्रामीण भागातील तसेच पंचक्रोशीतील छोटे मोठे व्यापारी यांची आर्थिक गरज भागविण्यासाठी कोळपेवाडी येथे गौतम सहकारी बँकेची स्थापना केली. माजी आमदार अशोकराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली व कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते आशुतोष काळे यांच्या नेतृत्वाखाली गौतम सहकारी बँक प्रगतीच्या शिखराकडे झेपावत आहे. सदर पुरस्कार वितरण प्रसंगी राज्य फेडरेषन मुंबईचे संचालक अॅड. अशोक शेळके, राज्य असोसिएशनच्या संचालिका प्रा. मेघा यशवंत काळे, गौतम सहकारी बँकेचे मुख्य व्यवस्थापक बापूसाहेब घेमुड, प्रशासकीय अधिकारी नानासाहेब बनसोडे आदी मान्यवर उपस्थित होते.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram