गणेशोत्सवा निमित्त कर्मवीर काळे कारखान्यावर सत्यनारायण महापूजा संपन्न

कोपरगाव तालुक्यातील कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर याहीवर्षी गणेशोत्सव मोठा उत्साहात साजरा करण्यात येत आहे. गणेशोत्सवा निमित्त शुक्रवार दिनांक १/९/२०१७ रोजी कारखान्याचे चेअरमन युवा नेते आशुतोष काळे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. चैतालीताई काळे यांच्या शुभ हस्ते श्री. सत्यनारायण महापूजा पार पडली. कारखान्याचे चीफ इंजिनिअर दौलतराव चव्हाण व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. चंद्रकला चव्हाण यांच्या शुभहस्ते ‘श्री गणेशाची’ स्थापना करण्यात आली आहे. गणेशोत्सव उपसमितीच्या वतीने विविध धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. कार्यक्रमासाठी परिसर व पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत. श्री. सत्यनारायण महापूजा कार्यक्रमासाठी कारखान्याचे व्हा. चेअरमन सूर्यभान कोळपे, संचालक सुनील शिंदे, राजेंद्र मेहेरखांब, कार्यकारी संचालक गिरीश जगताप, आसवनी विभागाचे जनरल मॅनेजर जयंतराव भिडे, कारखान्याचे जनरल मॅनेजर ए. व्ही. काळे, सेक्रेटरी सुनील कोल्हे, ऑफिस सुपरीटेडेट बाबा सय्यद ,गोदावरी खो-याचे जनरल मॅनेजर सोपानराव डांगे, कामगार संचालक रामचंद्र भारसाकळ, अरुण पानगव्हाने, उपसमिती कार्याध्यक्ष चिने, तसेच कारखाना व सर्व सलंग्न संस्थांचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ह.भ.प. विनायक महाराज वाघ यांनी केले.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram