डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी योजने अंतर्गत शेतक-यांना विहिरींसाठी आर्थिक अनुदान – आशुतोष काळे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेचा अनुसूचित जाती व नवबौद्ध शेतक-यांनी विहिरीसाठी आर्थिक अनुदान दिले जाणार आहे. या योजनेचा कोपरगाव तालुक्यातील अनुसूचित जाती, व नवबौद्ध गरजू शेतक-यांनी लाभ घ्यावा असे कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते आशुतोष काळे यांनी म्हटले आहे. जिल्हा परिषद अहमदनगर यांचेवतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजने अंर्तगत अनुसूचित जाती व नवबौद्ध शेतक-यांना विहिरींसाठी आर्थिक अनुदान देण्यात येणार आहे.या योजने अंतर्गत प्रथम २० विहिरींचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहेत. या योजनेचा आर्थिक लाभ घेण्यासाठी शेतक-यांना काही निकषांची पूर्तता करावी लागणार आहे. यामध्ये लाभधारक शेतक-याकडे अनुसूचित जाती व नवबौद्ध असल्याबाबतचा जातीचा सक्षम प्राधिका-याचे जात प्रमाणपत्र, ८ अ/ ७/१२ उतारे (८ अ स्वतंत्र नावाने आवश्यक), शेतक-यांच्या स्वताच्या नावे किमान ०.४० हेक्टर व कमाल ६.०० हेक्टर जमीन असावी, लाभार्थ्याकडे आधारकार्ड असणे आवश्यक आहे, लाभार्थ्याचे राष्ट्रीयकृत बॅंकेतील खाते आधारकार्डशी सलग्न असावे. या योजनेचा लाभ दारिद्र्य रेषेखालील लाभार्थ्यांना मिळावा यासाठी प्रथम प्राधान्य देण्यात येणार असून शेतक-यांचे एकून उत्पन्न एक लाख पन्नास हजार पर्यंत असावे. नवीन विहिरीसाठी वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेकडून पाणी उपलब्धतेचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. आदी बाबींची पूर्तता सदरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेचा आर्थिक लाभ घेण्यासाठी लाभार्थी शेतक-यांना करावी लागणार आहे. ही योजना अंजनापूर, रवंदे, कोळगावथडी, कोळपेवाडी, खोपडी, घरी, चांदेकसारे, चासनळी, जेऊरकुंभारी, जवळके, तळेगावमळे, देर्डे को-हाळे, देर्डे चांदवड, डाऊच खु., डाऊच बु., धामोरी, धोत्रे, धोंडेवाडी, पोहेगाव, बक्तरपूर, बहादरपूर, बहादराबाद, मंजूर, मढी बु., मनेगाव, मायगावं देवी, माहेगाव देशमुख, मोर्विस, रांजणगाव देशमुख, वडगाव, वेळापूर, वेस, शहाजापूर, शहापूर, सुरेगाव, सांगवी भूसार, सोनेवाडी, सोयेगाव, हंडेवाडी व हिंगणी आदी गावांचा सामावेश असून या योजनेबाबत अधिक माहिती कोपरगाव पंचायत समितीच्या अधिका-यांकडून घेवून कोपरगाव तालुक्यातील गरजू अनुसूचित जाती व नवबौद्ध शेतक-यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आशुतोष काळे यानी म्हटले आहे.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram