विजयाची परंपरा कायम ठेवण्यासाठी ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांनी सज्ज रहावे - आशुतोष काळे

कोपरगाव तालुक्यात सर्वत्र विकासाच्या नावाने बोंबाबोंब सुरु आहे. सध्या आश्वासने देवून जनतेला नादी लावण्याचे काम सुरु असून या आश्वासनाला कोपरगाव तालुक्याची जनता वैतागली आहे. विकासाचे प्रश्न फक्त राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षच सोडवू शकतो अशी भावना सर्वसामान्य जनतेच्या मनात निर्माण झाली आहे. त्यामुळे तालुक्यातील जनतेचा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षावरचा विश्वास अधिक दृढ होत चालला आहे. त्या विश्वासाच्या आधारावरच पंचायत समिती व जिल्हा परिषद तसेच नुकत्याच पार पडलेल्या चांदेकसारे जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला निर्भेळ यश मिळाले आहे. या यशाची परंपरा यापुढेही कायम ठेवण्यासाठी होऊ घातलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांनी सज्ज रहावे असे प्रतिपादन कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते आशुतोष काळे यांनी कोपरगाव तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या आघाडी सेल तालुका अध्यक्ष निवडी प्रसंगी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन प्रसंगी करून ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे रणशिंग फुकले आहे. कोपरगाव तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या आघाडी सेल तालुका अध्यक्षांच्या निवडीचा कार्यक्रम शुक्रवार दिनांक १/९/२०१७ रोजी पार पडला. यावेळी सौ. चित्राताई बर्डे महिला सेल अध्यक्ष, सौ. स्वप्नजा वाबळे युवती सेल अध्यक्ष, दिलीपराव बोरनारे सेवा दल सेल, संकेत कडवे विद्यार्थी सेल, कौसरभाई सय्यद अल्पसंख्यांक सेल, सुनील मोकळ मागासवर्गीय, डॉ. विनय गिडगे डॉक्टर सेल, अॅड. रमेश गव्हाणे वकील सेल, परमेश्वर कराळे अपंग सेल, विशाल देशमुख ग्रंथालय सेल, रविंद्र पिंपरकर किसान सेल, दिलीप चिंधे सोशल मिडिया सेल, नितीन शिंदे सहकार सेल, नारायण होन कामगार सेल, बाबुराव कोल्हे जेष्ठ नागरिक सेल, जगन बागल ओ.बी.सी. सेल आदी तालुकाध्याक्षांच्या निवडी करण्यात आल्या. युवा नेते आशुतोष काळे यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले. या प्रसंगी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सूर्यभान कोळपे, जी.प. सदस्य सुधाकर दंडवते, राष्ट्र्वादी कॉंग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष माधवराव खिलारी, युवक तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर, कारख्नान्याचे संचालक सचिन रोहमारे, आनंदराव चव्हाण, सुनील शिंदे,बाळासाहेब बारहाते, हरिभाऊ शिंदे, राहुल रोहमारे, रोहिदास होन, डॉ. मच्छिंद्र बर्डे, प्रशांत वाबळे आदी मान्यवरांसह कायकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram