विकासाचा अॅक्शन प्लॅन तयार करा - आशुतोष काळे

कोपरगाव तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींनी गावाच्या विकासाचा अॅक्शण प्लॅन तयार करा यामध्ये प्रथम पिण्याचे पाणी, त्यांनतर शौचालय व स्वच्छता व त्यांनंतर रस्ते व मुलभूत सुविधांना प्राधान्य द्यावे असे प्रतिपादन कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते आशुतोष काळे यांनी पंचायत समितीच्या विविध विभागाच्या आढावा बैठकीत केले. यावेळी आरोग्य विभागातील कर्मचा-यांना विशेष सूचना देतांना नागरिकांचे आरोग्य महत्वाचे आहे हे लक्षात ठेवून आरोग्य विभागाच्या कर्मचा-यांनी काम करावे वेळप्रसंगी कामाचे तास वाढवावे. कामचुकारपणा करणा-या कर्मचा-यांची गय केली जाणार नाही असा सज्जड इशाराच या आढावा बैठकीत त्यांनी आरोग्य कर्मचा-यांना दिला. पंचायत समितीच्या विविध विभागाची आढावा बैठक नुकतीच पंचायत समितीच्या सभागृहात पार पडली. यावेळी निंबोडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या विद्यार्थ्यांना श्रद्धांजलि वाहण्यात आली. युवा नेते आशुतोष काळे पुढे म्हणाले की, आरोग्य विभागाने जोपर्यंत नवीन कर्मचारी आरोग्य विभागात दाखल होत नाही तोपर्यंत जे कर्मचारी आहे त्या कर्मचा-यांनी नागरिकांचे हाल होणार नाही याची दक्षता घ्यावी. आरोग्य विभागाने आंचलगाव व परिसरातील स्वाईन फ्ल्यू व इतर साथींच्या आजारांच्या बाबतीत काळजी घ्यावी. बांधकाम विभागाने दहा ते पंधरा वर्षापूर्वी बांधलेल्या पाण्याच्या टाक्या आता पडायला लागल्या आहेत. यामध्ये वारी, भोजडे, काकडी, कोळगाव थडी, मंजूर, करंजी, सुरेगाव, कोळपेवाडी आदी गावातील धोकादायक असलेल्या पाण्याच्या टाक्याचा आढावा घेवून त्या संदर्भात तातडीने निर्लेखनाचे प्रस्ताव तयार करून त्या धोकादायक पाण्याच्या टाक्या पाडून घ्याव्यात. यामध्ये मुर्शतपूर, हिंगनवेढे, डाऊच, बोलकी, बहादराबाद, रांजणगाव देशमुख, भोजडे, तीळवणी, रेलवाडी, कोकमठाण आदी गावातील धोकादायक शाळा खोल्यांचा तातडीने आढावा घेण्याच्या सूचना केल्या. जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी स्थानिक पालकांना व गावक-यांना विश्वासात घेवून शिक्षकांनी त्या त्या गावातील गावक-यांना विश्वासात घेवून शिक्षकांनी गावातील विद्यार्थी संख्या वाढविण्यासाठी काम करावे तसेच विद्यार्थ्यांना मिळणारा आहार हा चांगल्या दर्जाचा आहे का नाही याची खबरदारी घेण्याचे सांगितले. यावेळी पंचायत समितीच्या सभापती सौ. अनुसया होन, उपसभापती अनिल कदम, गटविकास अधिकारी वाघिरे, सदस्य अर्जुन काळे, मधुकर टेके, श्रावण आसने, सौ.पूर्णिमा जगधने, बाळासाहेब राहणे, कारभारी आगवन, कर्मवीर काळे कारखान्याचे संचालक सचिन रोहमारे, सुनील शिंदे, हरिभाऊ शिंदे, राहुल,रोहमारे प्रसाद साबळे, प्रशांत वाबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram