गौतम पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांना एल. आय. सी. तर्फे स्टुडंट ऑफ द इयर २०१७ पुरस्कार

भारतीय आयुर्विमा महामंडळ शाखा कोपरगाव यांचेवतीने कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या गौतम पब्लिक स्कूलच्या दहा विद्यार्थ्यांना स्टुडंट ऑफ द इयर २०१७ पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. भारतीय आयुर्विमा महामंडळ शाखा कोपरगाव यांचे वतीने दरवर्षी विद्यार्थ्यांना शालेय अभ्यास, संगीत, क्रीडा व साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणा-या विद्यार्थ्यांना पुरस्कार देवून गौरविण्यात येते. मागील वर्षी महर्षी विद्या मंदिर कोपरगाव या विद्यालयातील विद्यार्थ्यांना पुरस्कार देवून गौरविण्यात आले होते. यावर्षी गौतम पब्लिक स्कूलमधील शुभम मोरे, संकेत नळे, निखील खैरनार, रोहित पानगव्हाणे, कौस्तुभ गोसावी, विवेक बिडवे,प्रतिक भागवत,कु. विद्या शिंदे, कु. साक्षी गुलदगड, कु. ऋतुजा घुमरे या विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना स्टुडंट ऑफ द इयर २०१७ पुरस्काराने सन्मान चिन्ह देवून सन्मानित करण्यात आले आहे. या विद्यार्थ्यांचे कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष माजी आमदार अशोकराव काळे, विश्वस्त आशुतोष काळे, व्हा. चेअरमन छबुराव आव्हाड, सचिव सौ.चैतालीताई काळे, सहसचिव सौ. स्नेहलताई शिंदे, तसेच सर्व गव्हर्निंग कौन्सिल सदस्य, प्राचार्य नूर शेख यांनी अभिनंदन केले आहे. याप्रसंगी भारतीय आयुर्विमा महामंडळ शाखा कोपरगावचे असिस्टंट ब्रঁच मॅनेजर शैलेश तोतडे, विकास अधिकारी प्रशांत वाबळे, फिजिकल डायरेक्टरसुधाकर नीलक, सुपरवायझर सत्तार शेख, हॉकी प्रशिक्षक रमेश पटारे, प्रा. कु. मीना राठी आदी उपस्थित होते.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram