जवाहरलाल नेहरू हॉकी स्पर्धेत गौतम पब्लिक स्कूलचे दोन संघ राज्य पातळीवर

दिनांक १३ व १४ सप्टेबर रोजी जिल्हाक्रीडा अधिकारी कार्यालय पुणे यांचे वतीने आयोजित करण्यात आलेल्या नेहरू हॉकी स्पर्धा शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी, पुणे येथे नुकत्याच पार पडल्या. या स्पर्धेत कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या गौतम पब्लिक स्कूलच्या १५ व १७ वर्षे वयोगटात दोन्ही संघानी विजेतेपद पटकाविले. असून राज्यस्तरीय नेहरू हॉकी स्पर्धा दिनांक २० सप्टेबर रोजी शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी, पुणे येथे पार पडणार आहे. या स्पर्धेत गौतम पब्लिक स्कूलच्या १५ वर्षे वयोगटात हॉकीच्या अंतिम सामन्यात सेंट जोसेफ स्कूल, पुणे शहर या संघावर ३-१ अशा गोल फरकाने तर १७ वर्ष वयोगटात पिंपरी चिंचवड संघावर १-0 गोलने विजय मिळवीत राज्यस्तरीय नेहरू हॉकी स्पर्धेत पुणे विभागाची नेतृत्व करण्याची परंपरा कायम राखली आहे अशी माहिती शाळेचे प्राचार्य नूर शेख यांनी दिली आहे. अंतिम सामन्यात १५ वर्षे वयोगटातील संघाकडून तेजस बोरसे, ओम बडवर(दोन गोल) व अजय गायके यांनी गोल नोंदविले.तर प्रतिक खडसे याने अप्रतिम गोलरक्षण केले. संघासाठी कल्पेश माळी, घन:शाम आहिरे व केतन निकम यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. १७ वर्षे वयोगटातील अंतिम सामन्यात गौतम पब्लिक स्कूलच्या संघाकडून सुमित घुमरे याने विजयी गोल नोंदविला. ऋषिकेश गायके याने अप्रतिम गोलरक्षकाची भूमिका बजावत प्रतिस्पर्धी संघाला एकही गोल करू दिला नाही. या संघाकडून संकेत शिंदे, रेहान शेख, कृष्णा पाटील, निखील पाटील, ऋतिक घुमरे, यशराज खेमनर, ऋषिकेश अंभोरे यांनी नेत्रदीपक खेळ केला. या दोनही विजयी संघास शाळेचे फिजिकल डायरेक्टर,सुधाकर नीलक, हॉकी प्रशिक्षक रमेश पटारे,व्हॉलीबॉल संघ व्यवस्थापक सत्तार शेख, क्रीडा प्रशिक्षक रिजवान पठान, संजय इटकर व कन्हैया गंगुले यांचे मार्गदर्शन लाभले. या स्पर्धेत मिळविलेल्या यशाबद्दल कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष माजी आमदार अशोकराव काळे, विश्वस्त आशुतोष काळे, व्हा. चेअरमन छबुराव आव्हाड, सचिव सौ.चैतालीताई काळे, सहसचिव सौ. स्नेहलताई शिंदे, तसेच सर्व गव्हर्निंग कौन्सिल सदस्य, प्राचार्य नूर शेख,पालक व माजी विद्यार्थी यांनी संघाचे अभिनंदन करून विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram