भारनियमन असतांना पाणी पुरवठा करू नका कोपरगाव शहर राष्ट्रवादीची कोपरगाव नगरपरिषदेकडे निवेदनाद्वारे मागणी

राज्यात मागील काही दिवसांपासून अचानक विजेचे भारनियमन वाढले असून कोपरगाव शहरातही सकाळ व दुपारच्या सत्रात भारनियमन होत आहे व याच वेळी पाणी पुरवठा केला जातो. भारनियमन सुरु असल्यामुळे कोपरगावच्या नागरिकांना पूर्ण क्षमतेने पाणी पुरवठा होत नाही. त्यामुळे विजेचे भारनियमन सुरु असतांना कोपरगाव शहरात पाणी पुरवठा करू नये अशा आशयाचे निवेदन युवा नेते आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सचिव संदीप वर्पे, शहराध्यक्ष सुनील गंगूले व गटनेते विरेन बोरावके यांनी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांना दिले आहे. दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, कोपरगाव शहरातील नागरिकांना पावसाळा सुरु असूनही चार ते पाच दिवसांनी नळाद्वारे पाणी पुरवठा केला जातो.त्यामुळे साहजिकच दैनदिन वापरासाठी आवश्यक असणारे पाणी पाच दिवस पुरेल एवढे मिळणे आवश्यक आहे. परंतु ऐन भारनियमनाच्या काळात पाणी पुरवठा केला जातो व त्यामुळे मोठया प्रमाणात पाणी पट्टी व घरपट्टी भरूनही पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. श्रीरामपूर नगरपरिषदेने वाढलेले विजेचे भारनियमन लक्षात घेवून भारनियमन असतांना पाणी पुरवठा न करता पाणी पुरवठ्याचे वेळापत्रकच बदलून टाकले आहे. त्यामुळे नागरिकांना पूर्ण क्षमतेने पाणी पुरवठा होत आहे.परंतु कोपरगाव नगरपरिषदेच्या पाणी पुरवठा विभागाने भारनियमनाची कोणतीच दखल घेतली नसल्याचे नगराध्यक्ष वहाडणे यांच्या लक्षात आणून दिले. कोपरगाव शहरातील नागरिक कोपरगाव नगरपरिषदेकडे भरीत असलेल्या पाणी पट्टीच्या मोबदल्यात नागरिकांना पूर्ण क्षमतेने पाणी मिळावे त्यसाठी भारनियमन काळात पाणी पुरवठा न करता पाणी पुरवठ्याचे वेळापत्रक बदलून पाणी पुरवठा करावा अन्यथा कोपरगाव शहराच्या नागरिकांसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने नाईलाजास्तव मोठे जनआंदोलन उभारले जाईल असा ईशारा देण्यात आला आहे. याप्रसंगी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सचिव संदीप वर्पे व शहराध्यक्ष सुनील गंगूले, गटनेते विरेन बोरावके, नवाज कुरेशी, सुनील शिलेदार, राजेंद्र वाघचौरे रमेश गवळी, फकीर मामू कुरेशी. बाला गंगुले, राजेंद्र जोशी, मुकुंद इंगळे, दिनकर खरे, चांदभाई पठाण, वाल्मिक लाहीरे, गणेश लकारे, राहुल, देवळालीकर, निखील डांगे, सोमनाथ आढाव, संदीप सावतडकर, योगेश नरोडे, नितीन बनसोडे, प्रसाद उदावंत, महेश उगले आदी मान्यवरांसह राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram