विभागीय पातळीवर व्हॉलीबॉल स्पर्धेत गौतम पब्लिक स्कूलकडे जिल्ह्याचे नेतृत्व

जिल्हास्तरीय क्रीडाधिकारी कार्यालय यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय मुलींच्या व्हॉलीबॉल स्पर्धा २० संप्टेंबर आत्मा मलिक क्रीडा संकुलात रोजी पार पडल्या. या स्पर्धेत गौतम पब्लिक स्कूलने सलग तिस-यांदा विभागीय पातळीवर अहमदनगर जिल्ह्याचे नेतृत्व करण्याचा मान पटकाविला आहे.सदर स्पर्धेत गौतम पब्लिक स्कूलच्या १४ व १७ वर्ष वयोगटातील दोन्ही संघ विभागीय पातळीवर अहमदनगर जिल्ह्याचे नेतृत्व करणार असल्याची माहिती शाळेचे प्राचार्य नूर शेख यांनी दिली आहे. पब्लिक स्कूलच्या १४ वर्ष वयोगटातील मुलींच्या व्हॉलीबॉल संघाने राहुरी व श्रीरामपूर संघावर सहज विजय मिळवीत अंतिम सामन्यात राहाता संघावर १६-१४, १५-१० असा दणदणीत विजय मिळविला. १७ वर्ष वयोगटातील मुलींच्या व्हॉलीबॉल संघाने पाथर्डी व नेवासा या संघावर मात करून अंतिम सामन्यात संगमनेर संघावर १२-१५, १५-७ व १५-११ ने विजय मिळवून स्पर्धेत वर्चस्व कायम राखले. १४ वर्ष वयोगटातील मुलींच्या व्हॉलीबॉल संघाकडून कर्णधार सायली निकम, साक्षी गुलदगड, सिधी क्षीरसागर, साक्षी पवार, श्रद्धा गाडे, समृद्धी पाटील, वसुंधरा वाडेकर, साक्षी पाटील,गीतांजली येवला, प्रियंका तांबे व भूमी घुमरे यांनी नेत्रदीपक खेळ केला. १७ वर्ष वयोगटातील मुलींच्या व्हॉलीबॉल संघाकडून कर्णधार तेजस पाटील,नयन पाटील, साक्षी घुमरे, ऋतुजा घुमरे, कीर्ती देवरे, साक्षी आरोटे,समीक्षा बजाज, सृष्टी पाटील,हर्षदा बर्वे, सलोनी पाटील,रश्मी अंबुरे,आयेशा गायके यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. दोन्ही विजयी संघास शाळेचे फिजिकल डायरेक्टर,सुधाकर नीलक, व्हॉलीबॉल संघ व्यवस्थापक सत्तार शेख, हॉकी प्रशिक्षक रमेश पटारे,संजय इटकर व कन्हैया गंगुले, रिजवान पठाण,नितीन साबळे,व सनी गुंजाळ यांचे मार्गदर्शन लाभले. सदरच्या स्पर्धेत मिळविलेल्या यशाबद्दल कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष माजी आमदार अशोकराव काळे, विश्वस्त आशुतोष काळे, व्हा. चेअरमन छबुराव आव्हाड, सचिव सौ.चैतालीताई काळे, सहसचिव सौ. स्नेहलताई शिंदे, तसेच सर्व गव्हर्निंग कौन्सिल सदस्य, प्राचार्य नूर शेख,पालक व माजी विद्यार्थी यांनी संघाचे अभिनंदन करून विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram