स्व. शंकररावजी काळे साहेबांनी फक्त रयत शिक्षण संस्थेलाच मोठं केलं – सरपंच पोपटराव पवार

स्वत:च्या गावात निवडून येणे अवघड होऊन बसले असतांना स्व. माजी खासदार शंकररावजी काळे साहेब कोपरगाव तालुक्यात राहून पारनेर तालुक्यातून निवडून आले यावरून त्यांचे शैक्षणिक व सामाजिक कार्य किती महान आहे याची कल्पना येते. स्व. साहेबांनी मनात आणले असते तर अहमदनगर जिल्ह्यात शैक्षणिक संस्थांच मोठं नेटवर्क उभं करू शकले असते पण साहेबांनी फक्त आणि फक्त रयत शिक्षण संस्थेलाच मोठं केलं. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या नंतर त्यांनी रयत शिक्षण संस्थेसाठी केलेलं कार्य अनमोल असून स्व. शंकररावजी काळे साहेब दुसरे कर्मवीर आहे असे प्रतिपादन आदर्श गाव हिवरे बाजार चे सरपंच पोपटराव पवार यांनी काढले. कोपरगाव तालुक्यातील श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व कनिष्ट महाविद्यालय, राधाबाई काळे कन्या विद्यामांदीर व कनिष्ट महाविद्यालय तसेच श्री. छत्रपती संभाजी प्राथमिक विद्यालय सुरेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने कोळपेवाडी येथील रयत संकुलात रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक व थोर शिक्षण महर्षी पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३० वा जयंती सोहळयाचा कार्यक्रम कोळपेवाडी रयत संकुलात आयोजित करण्यात आला होता याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य युवा नेते आशुतोष काळे होते. ते पुढे म्हणाले की, आपल गाव, परिसर व समाजासाठी काय केलं पाहिजे ते स्व. कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांकडून शिकावं. राजकारणात राहून समाजाचा विकास कसा करावा हे साहेबांकडून शिकावे. त्यांच्या सोबत चर्चा केल्यानंतर एक वेगळी प्रेरणा मिळत असे. त्यांच्या विचारांना व या भूमीला वंदन करण्यासाठीच या जयंती सोहळ्याच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिल्याचे त्यांनी सांगितले. कोपरगाव तालुक्याचे आधारस्तंभ असलेले युवा नेते आशुतोष काळे अमेरिकेत राहुन उच्च शिक्षण घेवूनही कर्मवीर भाऊराव पाटील व स्व. शंकररावजी काळे साहेब यांनी शिक्षण, सहकार व सामाजिक कार्य अतिशय चांगल्या प्रकारे पुढे घेवून जात असल्याचे सांगितले. उपस्थित विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना दिलखुलासपणे उत्तरे देवून विद्यार्थ्यानी आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी खेळाच्या मैदानावर व अभ्यासात सैराट व्हावे. देशाच्या संरक्षणासाठी सैराट व्हावे असा महत्वपूर्ण संदेश दिला. नवीन तंत्रज्ञानाचा आवश्य उपभोग घ्या मात्र या तंत्रज्ञानाकडे करमणूक म्हणून न बघता आपल्याला मंगळावर कसे पोहोचता येईल यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर करा. या तंत्रज्ञानाकडे करमणूक म्हणून बघितल्यास आपले भविष्य खराब होईल याची असा इशाराही दिला. क्रीडा व मनोरंजनाचे ग्लॅमर लवकर तयार होते परंतु जोपर्यंत ग्रामविकासाचे ग्लॅमर तयार होणार नाही तोपर्यंत ख-या अर्थाने विकास होणार नाही हे लक्षात ठेवा असा मौलिक सल्ला दिला. अध्यक्षीय भाषणात बोलतांना युवा नेते आशुतोष काळे म्हणाले की, रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक व थोर शिक्षण महर्षी पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या आदर्श विचारांना डोळ्यासमोर ठेवून स्व. शंकररावजी काळे साहेबांनी अहमदनगर जिल्ह्यात रयत शिक्षण संस्थेचा वटवृक्ष फुलविला. कर्मवीर आण्णांनी सोपविलेली जबाबदारी पार पाडून रयत शिक्षण संस्थेच्या गावोगावी संस्था उभारल्या व ६० वर्ष रयत शिक्षण संस्थेची सेवा केली. खेड्यातील नागरिक शहराकडे स्थलांतरीत होत असतांना हिवरे बाजार हे आदर्श गाव अपवाद ठरले आहे. स्वप्नात पहावे अशा हिवरे बाजार गावाने जगाच्या नकाशावर आपले नाव कोरले असून हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार यांनी देशासह जगापुढे एक आदर्श निर्माण केला असल्याचे सांगितले. या १३० वा जयंती सोहळयाच्या कार्यक्रमासाठी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन सूर्यभान कोळपे, संचालक मीननाथ बारगळ, कचरू कोळपे, सुंदरराव कदम, शिवाजीराव वाबळे,सुरेगावचे सरपंच वाल्मिक कोळपे, उपसरपंच सुहास वाबळे, डॉ. आय के सय्यद, खोत सर, बाळासाहेब ढोमसे आदी मान्यवरांसह विद्यार्थी व पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक व स्वागत प्राचार्य एन. ए. मते यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्राचार्या श्रीमती ज्योती देवरे यांनी केला तर आभार मुख्याध्यापक राजेंद्र पाचोरे यांनी मानले. सुत्र संचालन श्री. जुधारे सर व श्री. रणशिंग सर यांनी केले.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram