राष्ट्रीय नेहरू हॉकी स्पर्धेत गौतम पब्लिक स्कूलकडे महाराष्ट्राचे नेतृत्व

दिनांक २० व २१ सप्टेंबर २०१७ रोजी जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय पुणे आयोजित राज्यस्तरीय हॉकी स्पर्धा शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी, पुणे येथे नुकत्याच पार पडल्या.सदर स्पर्धेत कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या गौतम पब्लिक स्कूलच्या १५ वर्ष वयोगटातील संघाने विजेतेपद पटकाविले असून हा संघ दिल्ली येथे होणा-या जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय हॉकी स्पर्धेमध्ये दिनांक ८ ऑक्टोंबर पासून सहभागी होणार आहे. हा संघ राष्ट्रीय सब-ज्युनिअर जवाहरलाल नेहरू स्पर्धेत महाराष्ट्राचे नेतृत्व करणार असल्याची माहिती शाळेचे प्राचार्य नूर शेख यांनी दिली आहे. गौतम पब्लिक स्कूलच्या १५ वर्ष वयोगटातील संघाने औरंगाबाद व मुंबई विभागावर एकतर्फी विजय मिळवून अंतिम सामन्यात कोल्हापूर विभागावर ३-१ अशा गोल फरकाने दणदणीत विजय मिळवून राष्ट्रीय नेहरू हॉकी स्पर्धेत महाराष्ट्राचे नेतृत्व करण्याची परंपरा कायम राखली आहे. अंतिम सामन्यात १५ वर्षे वयोगटातील संघाकडून तेजस बोरसे, ओम बडवर, व शुभम मोरे यांनी गोल नोंदविले. तर प्रतिक खडसे याने अप्रतिम गोलरक्षण केले. संघासाठी सत्यम छानवाल, अजय गायके, सिद्धेश तिरसे, सार्थक पटारे, अनिकेत पवार, शुभम महाले, योगेश्वर येवला, संकेत नळे, ओंकार पोळ, कल्पेश माळी, घन:शाम आहिरे व केतन निकम यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन घडविले. गौतम पब्लिक स्कूल च्या १७ वर्षे वयोगटातील संघाने नासिक विभागावर १-0 असा विजय मिळवून राज्यस्तरीय स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यात या संघाला क्रीडा प्रबोधिनी संघाकडून निसटता पराभव स्वीकारावा लागला. संकेत शिंदे, रेहान शेख, कृष्णा पाटील, सुमित घुमरे, निखील पाटील, ऋतिक घुमरे,यशराज खेमनर व ऋषिकेश आभोरे यांनी संघासाठी चांगला खेळ केला तर ऋषिकेश गायके याने चांगले गोल रक्षण केले. गौतमच्या हॉकी संघास संघास शाळेचे फिजिकल डायरेक्टर,सुधाकर नीलक, हॉकी प्रशिक्षक रमेश पटारे, व्हॉलीबॉल संघ व्यवस्थापक सत्तार शेख, क्रीडा प्रशिक्षक रिजवान पठाण,संजय इटकर व कन्हैया गंगुले यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे विश्वस्त आशुतोष काळे यांनी विजयी संघाच्या खेळाडूंची भेट घेवून त्यांचे तसेच प्रशिक्षक व प्राचार्य यांचे आभिनंदन केले व राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. सदरच्या स्पर्धेत मिळविलेल्या यशाबद्दल कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष माजी आमदार अशोकराव काळे, व्हा. चेअरमन छबुराव आव्हाड, सचिव सौ.चैतालीताई काळे, सहसचिव सौ. स्नेहलताई शिंदे, राज्य बेसबॉल संघटनेचे अध्यक्ष अरुण चंद्रे, अहमदनगर जिल्हा क्रीडा अधिकारी उदय जोशी, क्रीडा मार्गदर्शक दादासाहेब देवकाते, तसेच सर्व गव्हर्निंग कौन्सिल सदस्य, प्राचार्य नूर शेख,पालक व माजी विद्यार्थी यांनी संघाचे अभिनंदन करून राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram