नवरात्रोत्सव निमित्त आयोजित जागर स्त्री शक्तीच्या कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. पुष्पाताई काळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका सौ. चैतालीताई काळे यांच्या प्रेरणेतून कोपरगाव येथे नवरात्रोत्सव निमित्त आयोजित करण्यात आलेल्या जागर स्त्रि शक्ती कार्यक्रमाला कोपरगाव शहरासह तालुक्यातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. कोपरगाव शहरात सालाबाद प्रमाणे याहीवर्षी प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या वतीने गुरुवार दिनांक २१/९/२०१७ पासून जागर स्त्री शक्तीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या वतीने कोफ्त कोपरगाव येथे प्रशिक्षण शिबीर ठेवण्यात आले होते. या प्रशिक्षण शिबिरात मोठया संख्येने युवती व महिलांनी सहभाग घेतला होता. जागर स्त्री शक्तीच्या कार्यक्रमासाठी महिला नियमित मोठ्या संख्येने उपस्थित राहून आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धा व कार्यक्रमामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहे. दररोज दुपारी १२. ते २.०० या वेळेत दुर्गा सप्तश्रुतीचे पाठ पठण व सायंकाळी ७ ते १० या वेळेत दांडीया असे नियमित कार्यक्रम सुरु आहेत. तसेच महिलांसाठी दररोज विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये उपवासाचे खाद्य पदार्थ बनविणे, निबंध स्पर्धा, उखाणे स्पर्धा, भजन स्पर्धा, होम मिनिस्टर व दांडीया स्पर्धा अशा प्रकारच्या विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या असून विजेत्या महिला स्पर्धकांना मोठी बक्षीस देण्यात येणार आहे. तसेच या जागर स्त्रि शक्ती कार्यक्रमामध्ये ह.भ.प. सौ. अद्वियता उमराणीकर यांचे कीर्तन सेवेचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. महिलांसाठी नेहमीच स्वतंत्र व्यासपीठ निर्माण करण्याचा प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. पुष्पाताई काळे यांचा प्रयत्न असतो. महिलांच्या उन्नतीसाठी हक्काचे व्यासपीठ म्हणून प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळ काम करीत आहे. त्या प्रयत्नांच्या माध्यमातून महिला भगिनींच्या कला, गुणांना वाव मिळावा हा त्यामागील हेतू असतो. अशा कार्यक्रमांमुळे महिलांना आपल्या संसाराच्या रहाटगाडग्यातून स्वत:साठी वेळ देवून विचारांची देवाण घेवाण होते. त्यामुळे प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या माध्यमातून वर्षभर विविध कार्यक्र्म राबविले जातात. नवरात्रोत्सव निमित्त आयोजित करण्यात आलेल्या या जागर स्त्रि शक्ती कार्यक्रमानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे व गौरी गणपती सजावट स्पर्धेचा बक्षीस वितरण कार्यक्रम शुक्रवार दिनांक २९/९/२०१७ रोजी मान्यवरांच्या हस्ते पार पडणार असून विविध स्पर्धांच्या विजेत्या मानकरी कोण होणार याची महिला वर्गामध्ये उत्सुकता लागली आहे. प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. पुष्पाताई काळे व सौ. चैतालीताई काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सौ. अनुसया होन, सौ. सोनाली रोहमारे, सौ. उमाताई वहाडणे, सौ. प्रतिभा शिलेदार, सौ. वर्षा गंगुले, सौ. रमाताई पहाडे, सौ. माधवी वाकचौरे, सौ. संगीता वर्पे, सौ.मनीषा गंगुले, सौ. स्वप्नजा वाबळे, सौ. मायादेवी खरे, सौ. रश्मी कडू, सौ. नेत्रा कुलकर्णी, सौ. मनीषा विसपुते, सौ. निर्मला बोरावके, सौ. अश्विनी आढाव, सौ. रुपाली अमृतकर, सौ. किरण डागा, सौ. रत्नप्रभा पाठक, सौ. भारती रुईकर आदी महिला भगिनी सर्व स्पर्धा व कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडत असून महिला वर्ग जागर स्त्री शक्तीच्या कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram