वेस –सोयेगाव च्या युतीच्या सरपंच सौ. मनीषा गोसावी समर्थकांसह राष्ट्रवादीत दाखल

कोपरगाव तालुक्यातीलवेस–सोयेगाव ग्रुप ग्रामपंचायतीच्या शिवसेना भाजपा युतीच्या विद्यमान सरपंच सौ. मनीषा भीमराज गोसावी यांनी आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. याप्रसंगी भीमराज विठ्ठल गोसावी व शंकर हरीगीर गोसावी यांचा व समर्थकांचा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे युवा नेते आशुतोष काळे यांनी सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या.यावेळी किसन पाडेकर, कौसर सय्यद, सिकंदर इनामदार, आप्पा शेंडगे, दिलीप जुंधारे, भागवत खंडीझोड आदी कार्यकर्ते उपस्थित होते. कोपरगाव तालुक्यातील एकून २४ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून यामध्ये वेस ग्रामपंचायतीचीही निवडणूक होत आहे. युवा नेते आशुतोष काळे यांच्याकडे कोपरगाव तालुक्याच्या विकासाची दूरदृष्टी आहे. त्यांच्या माध्यमातून वेस गावाचे विकासाचे अनुत्तरीत प्रश्न सोडविण्यासाठी समर्थकांसह राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला असल्याचे विद्यमान सरपंच सौ. मनीषा भीमराज गोसावी यांनी म्हटले असून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे विचार तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवणार असल्याचे सांगितले. सर्वसामान्य जनतेचे व विकासाचे प्रश्न फक्त राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षच सोडवू शकतो त्यामुळे कोपरगाव तालुक्यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात सध्या मोठ्या प्रमाणात इतर पक्षातून कार्यकर्त्यांचे इनकमिंग सुरु आहे. याच धर्तीवर वेस–सोयेगाव ग्रुप ग्रामपंचायतीच्या शिवसेना भाजपा युतीच्या विद्यमान सरपंच सौ. मनीषा भीमराज गोसावी यांनी आपल्या समर्थकांसह आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला आहे त्यामुळे वेस ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा झेंडा फडकणार आहे हे जवळपास निश्चित झाले आहे.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram