कर्मवीर काळे कारखान्याच्या सभासदांची व कामगारांची दिवाळी गोड कारखान्याचा ६३ बॉयलर अग्निप्रदीपन कार्यक्रम संपन्न

कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांना व कामगारांना दिवाळी सण गोड व्हावा यासाठी सन २०१६-१७ च्या उस गळीतास शेततळे अनुदान प्र.मे.टन १०० रुपये ठिबक सिंचन प्र.मे.टन १०० रुपये तसेच ऊस पुरवठा विशेष अनुदानाच्या स्वरूपात प्र.मे.टन १०० रुपये असा दर देवून व कामगारांना कारखान्याच्या अतिशय कठीण परीस्थितही १० अधिक एक असा ११ टक्के बोनस व हंगामी कर्मचा-यांना रिटेन्शन व त्रिपक्षीय समितीच्या करारानुसार १५ टक्के पगारवाढ फरकाची उर्वरित राहिलेल्या ५० टक्के रक्कमेपैकी निम्मी रक्कम याप्रमाणे पगारवाढ फरकाची ७५ टक्के रक्कम कामगारांना देवून सभासद व कामगारांची दिवाळी गोड केली असल्याचे प्रतिपादन कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते आशुतोष काळे यांनी केले. कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या ६३ व्या बॉयलर अग्निप्रदीपन कार्यक्रमा प्रसंगी ते बोलत होते. कारखान्याच्या सन २०१७-१८ या वर्षाच्या ६३ व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ कारखान्याचे जेष्ठ संचालक व मार्गदर्शक माजी आमदार अशोकराव काळे यांच्या अध्यक्षतेखाली व कारखान्याचे व्हाईस चेअरमन सूर्यभान कोळपे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. चंद्रकला सूर्यभान कोळपे यांच्या शुभ हस्ते विधिवत पूजा करून पार पडला. याप्रसंगी बोलतांना ते पुढे म्हणाले की, कारखान्याच्या सर्व गळीत हंगामाचा आढावा घेतल्यास दरवर्षी साखर उद्योगापुढे नवनवीन समस्या असतात. ऊसाच्या उपलब्धतेमध्ये सातत्य नाही. एवढ्या अडचणी असूनही माजी खासदार स्व. शंकररावजी काळे साहेबांनी घालून दिलेल्या आदर्श विचारांच्या जोरावर कारखाना आपली यशस्वी वाटचाल करीत आहे. मागील वर्षी कार्यक्षेत्रातील १.२५ लाख मे.टन व कार्यक्षेत्राबाहेरून १ लाख मे. टन ऊस आणून २.२५ लाख मे.टन ऊसाचे गाळप करून अडचणीचा गळीत हंगाम यशस्वी केला होता. यावर्षी कारखाना कार्यक्षेत्रात अंदाजे ३.२५ लाख मे.टन व कार्यक्षेत्राबाहेर २.२५ लाख मे.टन ऊसाचे करार करण्यात आले असून यावर्षी ५.५० लाख मे.टन ऊसाचे गाळप होईल असा अंदाज व्यक्त केला. यावर्षी पावसाचे प्रमाण अतिशय चांगले असून जायकवाडी सह सर्व धरणे तुडुंब भरलेली आहेत. त्याचबरोबर आपले के.टी.वेअरही पूर्ण क्षमतेने भरलेले आहेत त्यामुळे पूर्ण क्षमतेने आवर्तन मिळणार आहे. कारखान्याचा शेतकी विभाग सक्षम करण्यासाठी योग्य कार्यवाही कारखाना व्यवस्थापन करीत असून कारखान्याच्या कार्यक्षेत्रात ऊसाची उपलब्धता कशी वाढविता येईल याबाबत ऊस व्यवसायाला मार्गदर्शन करणा-या वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूटचे वेळोवेळी मार्गदर्शन घेत असल्याचे सांगितले. भविष्यात ऊस वाढीबाबत जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यासाठी शेतकरी मेळावे, ऊस पिक प्रात्यक्षिक घेणे याशिवाय एकरी ८० मे. टन च्या पुढे ऊस उत्पादन घेणा-या शेतक-यांना बक्षीस देणे आदी योजना राबवविणार असल्याचे त्यांनी आपल्या भाषणात नमूद करून उपस्थित सभासद, शेतकरी, कार्यकर्ते व कर्मचा-यांना युवा नेते आशुतोष काळे यांनी दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram