तालुक्याच्या लोकप्रतिनिधींनी तोंड वाजवीत बसण्यापेक्षा काम दाखवावे – आशुतोष काळे

या कोपरगाव तालुक्याच्या जनतेने तुमच्याकडे पंचायत समिती ठेवली नाही, कोपरगावचे नगराध्यक्षपद तुमच्याकडे ठेवले नाही , तुमचा एक जिल्हा परिषद सदस्य सुद्धा निवडून दिला नाही याची जान ठेवा. अल्पशा यशाने हुरळून जावू नका.नुसते तोंड वाजवीत बसण्यापेक्षा विकास करून दाखवा असे सडेतोड आव्हान कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते आशुतोष काळे यांनी कोपरगाव तालुक्यातील कुंभारी येथे तालुक्याच्या लोकप्रतिनिधींना केले. जनसुविधा योजने अंतर्गत १५ लाख रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या कुंभारीच्या नूतन ग्रामपंचायत इमारतीचे उदघाटन युवा नेते आशुतोष काळे यांच्या हस्ते पार पडले याप्रसंगी ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सभापती सौ. अनुसया होन होत्या. ते पुढे म्हणाले की, विकासाच्या मुद्यावर आम्ही एकत्र आलो. आम्ही एकत्र आल्याचे कोपरगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील जनतेला आवडले असल्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये अभूतपूर्व यश मिळाले. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत संमिश्र यश मिळाले. विरोधकांना थोडे चांगले यश मिळाले पण या यशाने ते हुरळून गेले आहे. आमचा पॅटर्न हा विकासाला चालना देणारा आहे राजकीय खोडा घालणारा नाही. माजी आमदार अशोकराव काळे यांनी ३५ वर्षाच्या रखडलेल्या विकासाला चालना देतांना विकासाची सुरुवातच कुंभारी गावातून केली. पण आज कोपरगाव तालुक्याची परिस्थिती काय आहे. मागील ३५ वर्षात जो कोपरगाव तालुका होता तीच परिस्थिती आज कोपरगाव तालुक्यात निर्माण झाली आहे. त्यासाठी तोंड वाजवीत बसण्यापेक्षा विकास करून दाखवावे असे आव्हानच तालुक्याच्या लोकप्रतिनिधींना केले. याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करतांना गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे, म्हणाले की, २६ ग्रामपंचायतीच्या निकालावर संपूर्ण तालुक्याचे चित्र तयार होऊ शकत नाही. त्यांच्याकडे जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये कोणत्याही प्रकारची सत्ता नाही त्यामुळे ग्रामपंचायत सार्वभौम व पंचायत समितीला कोणतेही अधिकार राहिले नाही असा विरोधकांकडून गैरसमज पसरविले जात आहे. परंतु प्रत्यक्षात १४ व्या वित्त आयोगाच्या निधीवर नियन्त्र ठेवण्याचे काम हे जिल्हा परिषद व पंचायत समितीचे आहे हे त्यांना माहीत नाही. शेतक-यांचे कर्ज माफ करण्यासाठी विकास निधीतून ३० टक्के कपात करणार मग विकास कसा करणार असा प्रश्न उपस्थित करून कोपरगाव तालुक्यातील एकही रस्ता धड राहिलेला नाही. इतर तालुक्यातील रस्ते होतात मग कोपरगाव तालुक्यातील रस्ते का होत नाही त्यामुळे कोपरगाव तालुक्यातील विकास किती खरा किती खोटा हे तुम्हीच ठरवा असे सांगीतले. याप्रसंगी राघवेश्वरनंदगिरी महाराज, सभापती सौ. अनुसया होन यांनी आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी जिल्हा परिषद सुधाकर दंडवते, पंचायत समितीचे उपसभापति अनिल कदम, गटविकास अधिकारी के.आर कलोडे, काळे कारखान्याचे उपाध्यक्ष व कोळपेवाडीचे नवनिर्वाचित सरपंच सूर्यभान कोळपे, पंचायत समिती सदस्य अर्जुनराव काळे, संचालक अरुण चंद्रे, सरपंच सौ. मथुराबाई कबाडी, माजी पंचायत समिती सदस्या सौ. स्वप्नजा वाबळे, रोहिदास होन, गौतम बँकेचे संचालक साहेबलाल शेख, जगन्नाथ वारुळे, प्रशांत वाबळे आदी मान्यवरांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना उपसरपंच शिवाजीराव घुले यांनी कुंभारी गावात जवळपास ८० लाख रुपयांचे विकास कामे केले असून १५ ते वीस लाख रुपयांचे विकास कामांचे प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्यात आले असल्याचे सांगितले. सूत्रसंचालन वाल्मिक नीळकंठ यांनी केले तर आभार आण्णासाहेब बढे यांनी मानले.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram