युवा नेते आशुतोष काळे डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम एक्सलन्स राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

सिटीझन्स इंटेग्रेशन पीस इन्स्टिट्यूट नवी दिल्ली यांचे वतीने उद्योग व सामाजिक क्षेत्रात भरीव कामगिरी करणा-या व्यक्तींना देशाचे दिवंगत राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या नावे दिला जाणारा डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम एक्सलन्स राष्ट्रीय पुरस्कार यावर्षी आशिया खंडात सहकार क्षेत्रात अग्रगण्य असणा-या कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते आशुतोष काळे यांना नुकताच नवी दिल्ली येथील इंडिया इंटरनॅसेंटर सेमिनार हॉल येथे देशाचे माजी गृहराज्य मंत्री व पंजाबचे माजी राज्यपाल शिवाजीराव पाटील चाकूरकर यांच्या हस्ते मॉरीशसचे भारतीय राजदूत जे गोवर्धन, माजी राज्यपाल व केंद्रीय मंत्री डॉ. भीष्म नारायण सिंग व नेपाळचे भारतीय राजदूत दिपकुमार उपाध्यय आदी मान्यवरांच्या उपस्थितीत नुकताच प्रदान करण्यात आला. आपल्या देशाची सर्वागीण प्रगती व्हावी. युवकांचा देशाच्या प्रगतीमध्ये जास्तीत जास्त सहभाग वाढावा यासाठी सिटीझन्स इंटेग्रेशन पीस इन्स्टिट्यूट नवी दिल्ली हि संस्था काम करते.या संस्थेच्या माध्यमातून देशाच्या प्रगतीमध्ये मोलाची कामगिरी बजावणारे देशाचे माजी राष्ट्रपती स्व.डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या कार्याची प्रेरणा उद्योग व सामाजिक क्षेत्रात काम करणा-या व्यक्तींना मिळावी यासाठी सिटीझन्स इंटेग्रेशन पीस इन्स्टिट्यूट नवी दिल्ली यांचे वतीने डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम एक्सलन्स राष्ट्रीय पुरस्कार डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी दिला जातो.यावर्षीचा हा पुरस्कार अतिशय कमी वयात कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याची जबाबदारी सांभाळत असतांना उद्योग, सहकार व सामाजिक क्षेत्रात अलौकिक कार्य करणारे,शांत व संयमी स्वभाव असलेले कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून अलौकिक कामगिरी करणारे व सामाजिक बांधिलकी जोपासतंना जनसामान्यांचे प्रश्न सोडविण्याची तळमळ असलेले कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते आशुतोष काळे यांना डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम एक्सलन्स पुरस्कार देवून सन्मानित केले आहे.या पुरस्कार सोहळ्याच्या कार्यक्रम प्रसंगी डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या ८६ व्या जयंतीनिमित्त त्यांचे जीवन व कार्य यावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram