आशुतोष काळे यांची दि डीस्टीलर्स असोसिएशन च्या उपाध्यक्षपदी निवड

आशिया खंडातील सहकार क्षेत्रात अग्रगण्य असणा-या कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते आशुतोष काळे यांची नुकतीच दि डीस्टीलर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या उपाध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली आहे. दि डीस्टीलर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र,मुबई ची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच अकलूज येथे पार पडली. अतिशय कमी वयात कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याची जबाबदारी अतिशय समर्थपणे सांभाळून कारखान्याचे चेअरमन युवा नेते आशुतोष काळे कारखान्याला वेगाने प्रगतीच्या दिशेने घेवून जात आहे, त्यांच्या कार्याची दखल घेवून अकलूज येथे पार पडलेल्या या सभेत एकमताने त्यांची उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. त्याचबरोबर अध्यक्षपदी श्री. विजयसिंह मोहिते पाटील यांची व खाजगी डीस्टीलरीचे श्री. कनु कलांनी यांचीही उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. अमेरिकेत राहून उच्च शिक्षण घेवूनही समाजकारणाचा वसा जोपासत स्व. माजी खासदार कर्मवीर शंकररावजी काळे यांच्या विचारांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आशुतोष काळे माजी आमदार अशोकराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याचा उत्तम कारभार कसा असावा याचे उदाहरण दाखवून दिले आहे. त्यांच्या कार्यपद्धतीचा आजपर्यंत नेहमीच गुण गौरव होत आला आहे, नुकतेच युवा नेते आशुतोष काळे यांना डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम एक्सलन्स राष्ट्रीय पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. दि डीस्टीलर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याने त्यांच्या कार्याचा विस्तार हा निश्चितपणे वाढला आहे. यापूर्वी माजी खासदार स्व. कर्मवीर शंकररावजी काळे यांनी सन १९९५ ते २००३ या कार्यकाळात ऑल इंडिया डीस्टीलर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदाचा कार्यभार सांभाळला आहे व माजी आमदार अशोकराव काळे यांनीही सन १९९९५ ते २००३ मध्ये दि डीस्टीलर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली असून आता काळे परिवाराच्या तीस-या पिढीकडे ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांच्या दि डीस्टीलर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram