कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचा ६३ वा गळीत हंगाम साखरेच्या दराबाबत घरगुती व ॵद्योगिक द्विस्तरीय दरपद्धतीची गरज – आशुतोष काळे

साखरेच्या वाढीव दराबद्दल व अवास्तव प्रचार, चिंता व टीका टिपणी करून साखरेचे दर नियंत्रित ठेवले जातात. पण त्यामुळे ऊस उत्पादक शेतक-यांचे नुकसान होते त्यासाठी शासनाने साखरेचा दर हा घरगुती वापरासाठी एक व ॵद्योगिक क्षेत्रासाठी वेगळा दर आकारून द्विस्तरीय दरपद्धती स्विकारावी असे प्रतिपादन कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आशुतोष काळे यांनी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या २०१७-१८ या वर्षाच्या ६३ व्या गळीत हंगामाच्या शुभारंभ प्रसंगी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ संचालक व प्रमुख मार्गदर्शक माजी आमदार अशोकदादा काळे होते. कारखान्याच्या सन २०१७- १८ या वर्षाच्या ६३ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ कारखान्याचे चेअरमन युवा नेते आशुतोष काळे व त्यांच्या सुविद्य पत्नी जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका सौ. चैतालीताई काळे यांच्या हस्ते विधिवत पूजन करून गव्हाणीत ऊसाची मोळी टाकून करण्यात आला. यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की, मागील वर्षीचा गळीत हंगाम कमी झाल्यामुळे कारखान्यास तोटामुक्त करता आले नाही परंतु चालू गळीत हंगामात कारखान्याला तोटामुक्त करण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले. चालू हंगामात कार्यक्षेत्रातून ३ .२५ मे. टन व कार्यक्षेत्रा बाहेरून २.२५ लाख मे. टन ऊस उपलब्ध होऊन ५.५० लाख मे. टन ऊसाचे गाळपाचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवले असले तरी सहा लाख मे. टन ऊस गाळप होईल यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे असे आवाहन केले. ऊसाच्या किमान हमी भावाच्या एफ. आर. पी. प्रमाणेच साखरेला सुद्धा किफायतशीर व हमीभाव निर्धारित करण्याची जबाबदारी केंद्र सरकारने अंगिकारली पाहिजे, सदोष व विसंगत धरसोड धोरणामुळे शेती व साखर उद्योगाला सातत्याने अस्थिरतेचा सामना कारवा लागत असल्यामुळे साखर उद्योगाला दूरदृष्टीच्या निश्चित धोरणांची आवश्यकता असल्याचे सांगितले. ऊस नियंत्रण मंडळाच्या शिफारशीनुसार ऊस तोडणी वाहतूक खर्चाची कमालमर्यादा निश्चित करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली.ऊस वाहतुकीच्या अंतरानुसार दर देण्याची पद्धत शासन अवलंबू पाहत आहे ही सहकाराला पोषक नाही सहकारी साखर कारखानदारीला मारक असल्याचे सांगत दरवर्षी सहकारी साखर उद्योगापुढे नवनवीन अडचणी येत असून सर्व अडचणींवर मात करीत कोणत्याच गोष्टीत मागे नसणारा कर्मवीर शंकराव काळे सहकारी साखर कारखाना ऊस दराच्या बाबतीतही मागे राहणार नाही अशी ग्वाही दिली. आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलतांना माजी आमदार अशोकराव म्हणाले की, २०१५ साली भयंकर दुष्काळामुळे पिण्याच्या पाण्याची व पशुधन वाचविण्याची मोठी चिंता होती. त्यामुळे ऊस क्षेत्रात मोठी घट होऊन त्याचा विपरीत परिणाम साखर कारखान्याच्या २०१६-१७ च्या हंगामावर झाला. यावर्षी चांगला पाऊस झाला आहे. जायकवाडी धरण १०० टक्के भरलेले आहे. आपले व्यवस्थापन चांगले असल्यामुळे परतीच्या पावसात गोदावरीला अचानक पाणी सोडले तरीही आपले के. टी.वेअर सुरक्षित राहिले व पूर्ण क्षमतेने भरलेले आहे. यावर्षी आवर्तनाची परिस्थिती चांगली राहील त्यामुळे जास्तीत जास्त ऊस लागवड करावी. ऊस तोडीची घाई न करता ऊसाची पूर्ण पणे वाढ होऊ द्यावी त्यामुळे उत्पादनही वाढेल व साखरेची रिकव्हरीही वाढते. सर्व कर्मचारी अधिकारी यांनी खर्चामध्ये काटकसर करून अतिशय कमी खर्चात चांगल्या प्रतीची साखर तयार करून ऊस उत्पादक शेतक-यांना जास्तीत जास्त मोबदला कसा देता येईल हा स्व. माजी खासदार स्व. शंकररावजी काळे साहेबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवण्याचे आव्हान केले. यावेळी कारखान्याचे कर्मचारी दत्तात्रय सातव यांचे गोदावरी नदीच्या पाण्यात पडून निधन झाले होते. त्यांच्या वारस पत्नी श्रीमती सुनिता दत्तात्रय सातव यांना दोन लाख रुपयांचा धनादेश चेअरमन युवा नेते आशुतोष काळे यांच्या हस्ते देण्यात आला. याप्रसंगी कारखान्याचे उपाध्यक्ष सूर्यभान कोळपे, जेष्ठ नेते छबुराव आव्हाड, कारभारी जाधव, कारभारी आगवन ,, नारायण मांजरे, कारखान्याचे सर्व संचालक मंडळ, सभापती अनुसया होन , सर्व जिल्हा परिषद सदस्य, संलग्न संस्थांचे सर्व चेअरमन, पदाधिकारी, कारखान्याचे कार्यकारी संचालक जी. जे. जगताप, आसवनी विभागाचे जनरल मॅनेजर जे. ए. भिडे, कारखान्याचे जनरल मॅनेजर ए. व्ही. काळे, सेक्रेटरी एस. एस. कोल्हे, ऑफिस सुपरिटेडेट बी. बी. सय्यद, चिफ इंजिनियर डी. बी. चव्हाण, शेतकी अधिकारी के.व्ही. कापसे, चिफ केमिस्ट एस. जे. ताकवणे, चीफ अकौटट दादा औताडे इतर पदाधिका-यांसह सभासद, शेतकरी व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचालक अरुणकुमार चंद्रे यांनी केले तर आभार उपाध्यक्ष सूर्यभान कोळपे यांनी मानले.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram