कृषी प्रदर्शन शेतक-यांच्या उन्नतीसाठी उत्तम मार्गदर्शक – आशुतोष काळे

कोणत्याही शेतमालाला निश्चित दर हा मिळत नाही, त्यामुळे शेती व्यवसाय तोट्याचा झाला आहे. शेतीविषयी होणारे नवनवीन शोध शेतक-यांना वेळेवर माहिती होत नाही. त्यामुळे शेतक-यांचे नुकसान होते. पारंपरिक शेती करतांना शेतीच्या नवीन तंत्रज्ञानाची शेतक-यांना तातडीने माहिती मिळून शेतक-यांचा फायदा व्हावा या उद्देशाने ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य शेतक-यांच्या व कष्टक-यांचे हित जोपासण्यात घालविले असे माजी खासदार स्व. कर्मवीर शंकररावजी काळे साहेव यांच्या पाचव्या पुण्यस्मरणार्थ आयोजित करण्यात आलेले कृषी प्रदर्शन हे शेतक-यांच्या उन्नतीसाठी उत्तम मार्गदर्शक असल्याचे प्रतिपादन कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते आशुतोष काळे यांनी केले. कर्मवीर शंकराव काळे मित्र मंडळ गौतमनगर व महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्ट कोपरगाव यांचे संयुक्त विद्यमाने साईबाबा कॉर्नर कोपरगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून प्रियदर्शनी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. पुष्पाताई काळे, सभापती अनुसया होन, छबुराव आव्हाड, काळे कारखान्याचे उपाध्यक्ष सूर्यभान कोळपे, जिल्हा परिषद सदस्य सुधाकर दंडवते, कर्मवीर शंकराव काळे मित्र मंडळाचे अध्यक्ष कारभारी आगवन, उपाध्यक्ष नारायण मांजरे उपस्थित होते. आशुतोष काळे पुढे म्हणाले की, सध्याचे युग हे आधुनिक युग आहे. त्यामुळे सर्वच क्षेत्रात दररोज नवनवीन शोध लागत असून प्रत्येक क्षेत्र प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. त्याप्रमाणे कृषी क्षेत्रातही रोज नवनवीन शोध व अत्याधुनिक शेती औजारे बाजारात येत आहे. त्याच बरोबर शेतीसाठी कोणते बी-बियाणे वापरले पाहिजे, कोणती खते वापरली पाहिजे ज्यामुळे शेतक-यांना घसघशीत फायदा होऊन त्यांचा आर्थिक स्तर सुधारण्यासाठी या कृषी प्रदर्शनाचा शेतक-यांना फायदा होणार आहे. या कृषी प्रदर्शनामध्ये शेतक-यांना विविध प्रकारचे फळे, भाजीपाला व इतर शेती उत्पादन तसेच शेतीच्या लागवडी पासून ते पिक काढणीपर्यंत लागणारी सर्व अत्याधुनिक यंत्र सामुग्रीची माहिती व खरेदी करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान, कमी पाण्यात जास्तीत जास्त उत्पादन कसे घेता येवू शकते त्यासाठी असणारे विविध पर्याय व शेतक-यांचे शेतीविषयक असलेले ज्ञान वाढून शेतक-यांची फक्त आणि फक्त प्रगती व्हावी हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवण्यात आला आहे. विविध नामांकित कंपन्यांच्या उत्पादनाची शेतक-यांना माहिती व्हावी यासाठी अतिशय अल्प दरात स्टॉलस उपलब्ध करून देण्यात आले असून राज्यासह परराज्यातील शंभर पेक्षा जास्त कंपन्यांनी आपली शेती विषयक उत्पादने या प्रदर्शनात मांडली आहेत. या कृषी प्रदर्शनाचा कोपरगाव तालुक्यातील शेतक-यांनी आवश्य लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. यावेळी कोपरगाव तालुका जिनिंग प्रेसिंगचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार, पंचायत समितीचे उपसभापति अनिल कदम सदस्य मधुकर टेके, श्रावण आसने, नगरसेवक गटनेते विरेन बोरावके, विजयराव आढाव, काळे कारखान्याचे संचालक पद्माकांत कुदळे, ज्ञानदेव मांजरे, राजेंद्र घुमरे, सुधाकर रोहोम, अशोक तीरसे, सर्जेराव कोकाटे, विठ्ठलराव आसने, आनंदराव चव्हाण, अशोक काळे, राहुल रोहमारे, रोहिदास होन, दिलीप बोरनारे, एम. टी. रोहमारे, सतीश कृष्णानी, दत्तोबा जगताप, कृष्णा आढाव, राजाभाऊ वाकचौरे, डॉ. तुषार गलांडे, दिनकर खरे, बाळासाहेब रुईकर, राहुल देवळालीकर, राजेंद्र आभाळे, राजेंद्र बोरावके, नितीन बनसोडे, चन्द्रशेखर म्हस्के, नंदकुमार डांगे, बापू वढने, सचिन गवारे, मुकुंद भुतडा, सचिन बढे, अशोक आव्हाटे, मुकुंद इंगळे, गगन हाडा, संदीप सावतडकर, राजेंद्र खैरनार, राजेंद्र फुलपगर, गणेश बोरुडे, विशाल निकम आदी मान्यवर उपस्थित होते.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram