काळे परिवार व कोसाका उद्योग समूह पाहिला की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी याची अनुभूती – ह.भ.प. अॅड. शेवाळे

समाजाने समाजासाठी रचलेली स्वयंसेवी संस्था म्हणून सहकाराकडे पाहिले जाते. परंतू सध्या सहकाराचा स्वाह:कार होत चालला आहे. परंतु स्व. शंकररावजी काळे साहेबांनी राजकारण विरहीत मानस एकत्र आणून कोसाका समुहाच उभे केलेले वैभव व काळे परिवार पाहून शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी या जगतगुरू संत तुकाराम महाराज यांच्या अभंगाची अनुभूती येत असल्याचे धर्माचार्य ह. भ. प. अॅड. श्री. शंकर महाराज शेवाळे (भीमा शंकर) यांनी माजी खासदार स्व. कर्मवीर शंकररावजी काळे यांच्या पाचव्या पुण्यस्मरण निमित्त आयोजित करण्यात आलेल्या कीर्तनाच्या कार्यक्रमात केले. कर्णाच दातृत्व व समुद्राची खोली ज्यांच्या अंतकरणामध्ये होती,ज्यांचे हात आकाशाला भिडलेले असतांना पाय मात्र जमिनीवर ठेवून स्व. साहेबांनी अवघी रयत माझी जगली पाहिजे या न्यायान आपल संपूर्ण आयुष्य वेचल. सहकाराचा यज्ञ प्रज्वलित करून त्यामध्ये आपल्या निस्वार्थ कष्टाची आहुती घालून सहकार हा स्वाहाकार नाही ही शिकवण घालून दिली. स्मृती उद्यानामध्ये साकारण्यात आलेला स्व. साहेबांचा जीवनपट, त्यांची साधी राहणी व मला स्वतासाठी काही कारायचं नाही मला जे काही करायचं ते या समाजासाठी करायचे या विचारातून त्यांनी उभे केलेलं कोसाका उद्योग समुहाच वैभव निस्वार्थी कर्मयोगीच करू शकतो त्यामुळे स्व. शंकररावजी काळे ख-या अर्थाने निष्काम कर्मयोगी असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी माजी आमदार अशोकराव काळे, प्रियदर्शनी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. पुष्पाताई काळे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते आशुतोष काळे, जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका सौ. चैताली काळे, कारखान्याचे उपाध्यक्ष सूर्यभान कोळपे, कोपरगाव नगरपरिषदेचे नगराध्यक्ष विजयराव वहाडणे, छबुराव आव्हाड, कारभारी जाधव, संभाजीराव काळे, मंडळाचे अध्यक्ष कारभारी आगवन, उपाध्यक्ष नारायण मांजरे, अॅड. प्रमोद जगताप, संलग्न संस्थांचे सर्व चेअरमन, पदाधिकारी, कारखान्याचे कार्यकारी संचालक जी. जे. जगताप, आसवनी विभागाचे जनरल मॅनेजर जे. ए. भिडे, कारखान्याचे जनरल मॅनेजर ए. व्ही. काळे, सेक्रेटरी एस. एस. कोल्हे, ऑफिस सुपरिटेडेट बी. बी. सय्यद, चिफ इंजिनियर डी. बी. चव्हाण, बाबासाहेब कोते,कारखान्याचे संचालक पद्माकांत कुदळे, विश्वासराव आहेर, सचिन रोहमारे, राजेंद्र घुमरे, सचिन चांदगुडे, विठ्ठलराव आसने, संजय आगवन, हरिभाऊ शिंदे, मीननाथ बारगळ, सर्जेराव कोकाटे, अशोकामामा काळे, ज्ञानदेव मांजरे, राजेंद्र मेहेरखांब , सुधाकर रोहोम, अरुण चंद्रे, अरुण पानगव्हाने, रामचंद्र भारसाकळ, सतीश कृष्णानी, माधवराव खिलारी,राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सचिव संदीप वर्पे, विजय आढाव, उपजिल्हाध्यक्ष दीपक साळुंके, शहराध्यक्ष सुनील गंगुले, नगरसेवक गटनेते विरेन बोरावके, मंदार पहाडे, संदीप पगारे, राजेंद्र वाकचौरे, बाळासाहेब रुईकर, अशोक आव्हाटे, राजेंद्र आभाळे, राजेंद्र बोरावके, प्रसाद आढाव, सुनील बोरा, सुनील सावतडकर, बापू वढने आदी मान्यवर उपस्थित होते.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram