कोपरगाव तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने नोट बंदी निर्णयाचा निषेध

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेतील काळा पैसा नष्ट करण्यासाठी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी ५०० व १००० रुपायांच्या नोटा चलनातून बाद करण्याच्या घेतलेल्या निर्णयाला आज एक वर्ष पूर्ण होऊनही सर्वसामान्य जनता, शेतकरी यांच्या राहणीमानात कुठ्लाही ही फरक पडला नाही. व्यापा-यांना नोट बंदीमुळे मोठा आर्थिक फटका बसला अनेक कंपन्या नोट बंदीच्या निर्णयामुळे बंद कराव्या लागल्या त्यामुळे लाखोंना आपल्या नौक-या गमवाव्या लागून देशाचा आर्थिक विकास दरही मंदावला. या नोट बंदीच्या निषेधार्थ कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने भजन करून निषेध नोंदवीत आंदोलन करून नायब तहसीलदार सुसरे यांना निवेदन देण्यात आले. देशातील काळा पैसा बाहेर काढणे, दहशतवाद मिटविणे व व्यवहरातील मोठ्या प्रमाणात असलेले बनावट चलन नष्ट करणे या उद्देशाने देशाच्या पंतप्रधांनानी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी ५०० व १००० रुपायांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा आत्मघातकी निर्णय घेतला. आत्मघातकी निर्णय का तर एवढा मोठा निर्णय घेतांना कोणत्याही प्रकारची पूर्वतयारी न केल्यामुळे या निर्णयाचा दुष्परिणाम काळ्या पैशावाल्यांना अजिबात जाणवला नाही मात्र शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेला या निर्णयाचा खूप त्रास सहन करावा लागला. ज्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला तो उद्देश मात्र कुठेही सफल झाला नाही. नोट बंदीच्या निर्णयाने देशांतर्गत असलेला काळा पैसा बाहेर येवून देशाची आर्थिक परिस्थिती सुधारेल त्याचा फायदा गरिबांना व शेतक-यांना होऊन त्यांचे आर्थिक राहणीमान उंचावेल असा अंदाज होता. परंतु असे काहीही न घडता या नोटबंदीचा त्रास काळ्या पैशावाल्यांना न होता तो त्रास गरीब जनता व शेतक-यांनाच जास्त झाला. कोणत्याही बँकेच्या रांगेत श्रीमंत व्यक्ति नोटा बदलून घेण्यासाठी उभी नव्हती. नोटा बदलून घेण्यासाठी रांगेत उभे होते ते शेतकरी व सर्वसामान्य जनता. या नोटबंदीच्या निर्णयामुळे चलन तुटवडा निर्माण होऊन कोपरगाव तालुक्यातील शेतकरी व सर्वसामान्य नागरिक यांना आपल्या कष्टाचे पैसे मिळविण्यासाठी तासन तास बँकेच्या रांगेमध्ये उभे रहावे लागले. काहींना तर आपलेच कष्टाचे पैसे काढण्यासाठी आपला जीव गमवावा लागला या नोटबंदीमुळे शेतक-यांनी मोठया कष्टाने उसने किंवा वेळप्रसंगी बँकेकडून, सावकाराकडून व्याजाने पैसे घेवून आपल्या शेतात पिकविलेला माल यामध्ये टोमॅटो, कांदा, डाळिंब, भाजीपाला हा शेतीमाल शेतक-यांना कवडीमोल भावाने विकूनही वेळेवर पैसे मिळत नव्हते. त्यामुळे या नोट बंदी निर्णयामुळे शेतक-यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. या नोटबंदीमुळे पैसे असूनही रुग्णांना वेळेवर उपचार मिळू शकले नाही.वेळप्रसंगी पैसे नसल्यामुळे काहींना आपले प्राण गमवावे लागले. ज्यांच्या घरी लग्न समारंभ किंवा अन्य धार्मिक कार्यक्रम आहे त्यांना आपलेच पैसे बँकेकडून मिळत नसल्यामुळे समारंभ पुढे ढकलावे लागले किंवा रद्द करावे लागले.एकून समाजातील सर्वच घटकांना या नोटबंदीमुळे खूप त्रास सहन करावा लागला आहे. नोटबंदीच्या निर्णयामुळे सामान्य नागरिक, व्यापारी, शेतकरी नोकरदारांसह संपूर्ण देशाला या नोटबंदीच्या निर्णयामुळे खूप मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागले असून कोपरगाव तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या वतीने निषेध नोंदविण्यात आला. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेश सचिव संदीप वर्पे, तालुकाध्यक्ष माधवराव खिलारी, विजय आढाव यांनी नोटबंदीच्या तुघलकी निर्णयाविरोधात जोरदार टीका केली.याप्रसंगी पंचायत समितीच्या सभापती अनुसया होन, उपसभापती अनिल कदम, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेश सचिव संदीप वर्पे, तालुकाध्यक्ष माधवराव खिलारी, कारभारी आगवन, शहराध्यक्ष सुनील गंगुले कारभारी आगवन, विजय आढाव, नगरसेवक गटनेते विरेन बोरावके, मंदार पहाडे, संदीप पगारे, महिला शहराध्यक्षा नगरसेविका सौ. प्रतिभा शिलेदार, नगरसेविका सौ. वर्षा कहार, सौ. माधवी वाकचौरे, काळे कारखान्याचे संचालक विश्वासराव आहेर, विठ्ठलराव आसने, ज्ञानदेव मांजरे, अशोक तीरसे, मीननाथ बारगळ, सचिन चांदगुडे, राजेंद्र मेहेरखांब, साहेबलाल शेख, राजेंद्र ढोमसे, भाऊसाहेब देवकर, सुदाम लोंढे, रामदास केकाण, फकीर मामू कुरेशी, कृष्णा आढाव, अशोक आव्हाटे, बाळासाहेब रुईकर, रमेश गवळी, राहुल देवळालीक्र, रावसाहेब साठे, विकास ब्नेद्रे, नारायण लांडगे, सचिन परदेशी, राजेंद्र वाकचौरे, संतोष टोरपे, गोरख पंडोरे, सांडूभाई पठान, किसन आहेर, राजेंद्र खैरनार, बाळासाहेब लांडगे, हुसेन कुरेशी, चांदभाई पठान प्रसाद साबळे, प्रसाद आढाव, संदीप सावतडकर, राजू जोशी नानासाहेब रोहोम, योगेश खालकर, निलेश डांगे, संदीप कपिले, चन्द्रशेखर म्हस्के, योगेश नरोडे, गणेश लकारे, समीर वर्पे, रविंद्र राउत, नितीन बनसोडे, तेजस गंगुले,दुर्गेश गंगुले,धनंजय कहार, मनोज खिलारी, राहुल कहार,कुंदन भारंबे, राहुल जगधने, चांगदेव आसने आदी मान्यवरांसह राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram