आशुतोष काळे यांच्या हस्ते सुवर्णपदक विजेत्या डॉ. राजेश्वरी पवार यांचा सत्कार

कोपरगाव येथील डॉ. सौ. राजेश्वरी सुधीर पवार (वय वर्ष ६०) यांनी नुकत्याच म्हैसूर येथील चामुंडा हिल येथे पार पडलेल्या १४ व्या मास्टर नॅशनल अॅक्वीटीक (स्विमिंग) १०० मीटर बटरफ्लाय स्पर्धेत सुवर्णपदक व ५० मीटर मध्ये रजतपदक मिळवून कोपरगाव शहराची मान उंचाविल्या बद्दल कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते आशुतोष काळे यांनी सत्कार करून डॉ. सौ. पवार यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिलया आहे. याप्रसंगी कर्मवीर काळे कारखान्याचे संचालक पद्माकांत कुदळे, डॉ. सुधीर पवार, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे गटनेते नगरसेवक विरेन बोरावके, मंदार पहाडे, राजाभाऊ वाकचौरे, दिनार कुदळे आदी मान्यवर उपस्थित होते. १४ वी मास्टर नॅशनल अॅक्वीटीक (स्विमिंग) स्पर्धा नुकतीच म्हैसूर येथे पार पडली. या स्पर्धेमध्ये २५ ते ८० वर्ष वयोगटातील जवळपास १५०० महिला–पुरुषांनी सहभाग घेतला होता. या स्विमिंग स्पर्धेमध्ये चार प्रकार असतात यामध्ये फ्री स्टाईल यामध्ये स्पर्धक कशाही प्रकारे स्विमिंग करू शकतो. यातील दुसरा प्रकार ब्रेस्ट स्ट्रोक यामध्ये फक्त छातीवर पोहणे, तिसरा प्रकार बॅक स्ट्रोक पाठीवर पोहणे व यातील सर्वात अवघड स्विमिंग प्रकार आहे तो म्हणजे बटरफ्लाय. या बटर फ्लाय स्पर्धेत डॉ. सौ. राजेश्वरी सुधीर पवार यांनी १०० मीटर बटरफ्लाय स्पर्धेत सुवर्णपदक व ५० मीटर मध्ये रजतपदक मिळविले आहे. मागील तीन वर्षापासून डॉ. सौ. पवार या स्पर्धेमध्ये सहभागी होत आहे. लहानपणापासूनच पोहण्याचा छंद असल्यामुळे मागील वर्षीही त्यांनी तीन सुवर्ण पदकांना गवसणी घातलेली आहे. वयाच्या ६० व्या वर्षी त्यांनी मिळविलेले सुवर्णपदक त्यामुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram