मोर्वीस ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित तीन सदस्य काळे गटात दाखल

नुकत्याच पार पडलेल्या २६ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत कोपरगाव तालुक्यातील मोर्वीस ग्रामपंचायतीची सत्ता काळे गटाकडून कोल्हे गटाने मिळविली. दोन दिवसांपूर्वी कोल्हे गटाचे सरपंच व उपसरपंच यांच्या निवडीही झाल्या परंतु ग्रामपंचायतीच्या सत्तेमध्ये आपल्या विरोधकच राहिला नाही या भ्रमात असणा-या कोल्हे गटाला जबरदस्त हादरा बसला आहे. कोल्हे गटाच्या नवनिर्वाचित विद्यमान तीन सदस्यांनी नुकताच कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते आशुतोष काळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. स्थानिक नेतृत्वावर आमचा विश्वास नाही. सरपंच ,उपसरपंच निवडीच्यावेळी आम्हाला विश्वासात घेतले नाही. त्यामुळे भविष्यात विकासाच्या बाबतीत या नेतृत्वाकडून गावाचा विकास होणार नाही. त्यामुळे आम्ही राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश करीत असल्याचे नवनिर्वाचित सदस्य गंगा दगडू वाघ, सौ. ललिता बाबासाहेब बर्डे, सौ. लक्ष्मीबाई बर्डे यांनी सांगितले आहे. निवड झालेले सरपंच हेसुद्धा आशुतोष काळे यांच्या विकासाभिमुख विचारांना मानणारे असून आदिवासी भागाचा विकास करण्यासाठी त्यांनीही राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश करावा असेही या सदस्यांनी म्हटले आहे. याप्रसंगी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक सचिन चांदगुडे, सर्ज्राव सोनवणे, साहेबराव सोनवणे, शरद वाघ, संतोष पगारे, खंडू सरडे, बाजीराव सरडे, श्रीहरी जाधव, बाबासाहेब खर्डे, सीताराम जाधव, दगडू बर्डे, प्रकाश सोनवणे, संतोष सोनवणे, गुलाब सरडे, प्रभुराम सोनवणे, नाना पगारे, शंकर बर्डे, स्वप्नील पगारे, नामदेव जाधव, अशोक वाघ, सोपान जिरे, वाल्मिक सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram