कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे चा-या उकरून द्या

मागील चार वर्षापासून गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतकरी दुष्काळाने होरपळला आहे. यावर्षी पर्जन्यमान आतिशय चांगले झाले आहे. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत रब्बीसाठी दोन व उन्हाळी तीन आवर्तन देण्याचे ठरले आहे त्याच बरोबर शेतीसाठी पाणी देतांना मुख्य चा-या उकरून देण्याचे ठरले आहे. त्यामुळे सिंचनासाठी पाणी देतांना मुख्य चा-या उकरूनच सिंचनासाठी पाणी द्यावे अशी मागणी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते आशुतोष काळे यांनी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता, नासिक यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे. पाटबंधारे विभागाला दिलेल्या निवेदनात आशुतोष काळे यांनी असे म्हटले आहे की, गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतकरी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत होणा-या निर्णयानुसार आपले सिंचनाचे नियोजन करीत असतो. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत मुख्य चा-या उकरून देण्याचे ठरले असल्यामुळे बहुसंख्य शेतक-यांनी सात नंबर पाणी मागणी अर्ज भरले आहेत. ज्या ज्या शेतक-यांनी पाणी मागणी अर्ज भरले आहेत त्या शेतक-यांना सिंचनासाठी पाणी देणे बंधनकारक आहे. परंतु मागील वेळेस सिंचनासाठी आवर्तन देतांना पाटबंधारे विभागाने मर्यादित क्षेत्रातील शेतक-यांना सिंचनासाठी पाणी दिले होते. त्यावेळी पाणी कमी असतांना पाण्यापासून शेतकरी वंचित राहिले. आज गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रातील सर्व धरणे तुडुंब भरलेली आहेत. यावर्षी जायकवाडी धरणामध्ये पाणी सोडले जाणार नाही. अशी परिस्थिती असतांना जर या चा-या उकरल्या गेल्या नाही तर धरणांमध्ये मुबलक पाणी साठा असतांना या शेतक-यांना सात नंबर पाणी मागणी अर्ज भरूनही पाण्यापासून वंचित राहावे लागेल याची पाटबंधारे विभागाने गांभीर्याने नोंद घ्यावी. धरणे भरलेली असतांना शेतकरी पाण्यापासून वंचित राहू नये व शेतक-यांचे नुकसान होऊ नये अशी माझी स्पष्ट भूमिका आहे. कालव्यांच्या मुख्य चा-यांमध्ये मोठ्या प्रमाणात झाडे झुडपे व काटेरी वनस्पती वाढल्यामुळे शेतक-यांना पूर्ण क्षमतेने पाणी मिळणार नाही. त्यामुळे साहजिकच शेतक-यांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत मुख्य चा-या उकरून देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी पाटबंधारे विभागाने करावी. सध्या गोदावरी कालव्याचे आवर्तन सुरु झाले असून गोदावरी कालव्यांना सोडण्यात आलेले आवर्तनातून सर्वप्रथम पिण्यासाठी पाणी देण्यात येणार आहे. त्यानंतर सिंचनासाठी पाणी देण्यात येणार आहे. यामध्ये जवळपास आठ ते दहा दिवसाचा कालावधी जाणार असून या कालावधीत झाडाझुडपांनी व काटेरी वनस्पतींनी वेढलेल्या मुख्य चा-या उकरून द्याव्या व काही वितरीकांचे गेट नादुरुस्त असून हे गेट तातडीने दुरुस्त करावे अशी मागणी आशुतोष काळे यांनी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांचेकडे केली आहे.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram