मा. आ. के.बी.रोहमारे स्मृती दिनानिमित्त आयोजित बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पुणे संघ अजिंक्य

कोपरगाव बॅडमिंटन क्लब व के.जे. सोमय्या व के. बी. रोहमारे महाविद्यालय यांचे संयुक्त विद्यमाने मा. आ. के.बी.रोहमारे स्मृती दिनानिमित्त दिनांक ९/१२/२०१७ व १०/१२/२०१७ रोजी राज्यस्तरीय दुहेरी बॅडमिंटन स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत एकूण ९९ संघांनी सहभाग घेतला. या स्पर्धेचा अंतिम सामना पुणे व कोल्हापूर संघामध्ये होऊन या मध्ये पुणे संघाने बाजी मारीत विजय मिळविला. विजेत्या संघाला स्पर्धेचे प्रथम क्रमांकाचे २१,०००/-रुपायांचे पारितोषिक कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते आशुतोष काळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. याप्रसंगी कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोकराव रोहमारे, सचिव अॅड. संजीव कुलकर्णी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एस. यादव, महाविद्यालयाच्या स्थानिक व्यवस्थापन समितीचे सदस्य संदीप रोहमारे, अॅड. राहुल रोहमारे, अशोक खांबेकर तसेच कोपरगाव बॅडमिंटन क्लबचे सर्व सदस्य उपस्थित होते. या स्पर्धा दोन दिवस मोठ्या उत्साहात व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्या. या स्पर्धेसाठी कोपरगाव शहरातील बहुतांश व्यापारी मित्रमंडळीचे सहकार्य लाभले. या स्पर्धेतील द्वितीय क्रमांकाचे ११,०००/- रुपयांचे बक्षीस उपविजेत्या कोल्हापूर संघाला देण्यात आले. तृतीय क्रमांकाचा पुणे संघ ५,०००/- रुपयांचा तर चतुर्थ क्रमांक कोपरगाव संघाने पटकावून ३,०००/- रुपयांचा मानकरी ठरला आहे. या स्पर्धेत अक्षय मांडवडकर व विशाखा ककाळे यांना उत्कृष्ट खेळाडूंचे रुपये २,५००/- बक्षीस म्हणून देण्यात आले. तसेच सायली टेके. सुमित बाविस्कर व विशाखा ककाळे यांना कीट देण्यात आले.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram