कोपरगावमध्ये श्री साई संगीतमय कथा महोत्सवास भक्तीमय वातावरणात प्रारंभ

श्री. साईबाबा महासमाधी महोत्सव व माजी खासदार स्व. कर्मवीर शंकररावजी काळे यांच्या पुण्यस्मरणार्थ कोपरगाव शहरातील तहसील कचेरीच्या भव्य प्रांगणात प्रियदर्शनी महिला मंडळ कोपरगाव व साई मंजिरी प्रतिष्ठान कोपरगाव यांचे संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक १६/१२/२०१७ रोजी मोठ्या भक्तीमय वातावरणात प्रारंभ झाला कोपरगाव शहरात प्रथमच ह.भ.प.साई कथाकार कैलास महाराज राजगुरू यांच्या रसाळ वाणीतून माजी आमदार अशोकराव काळे,प्रियदर्शनी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. पुष्पाताई काळे व युवा नेते आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री साई संगीतमय कथा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या साई कथा कार्यक्रमाचे प.पु. गुरुवर्य रमेशगिरीजी महाराज, प.पु. गोपालकृष्ण महाराज, प.पु. उंडे महाराज, ह.भ.प.साई कथाकार कैलास महाराज राजगुरू आदी महात्म्यांच्या शुभ हस्ते प्रतिमा पूजन करून करण्यात आले. याप्रसंगी प्रियदर्शनी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. पुष्पाताई काळे, कोपरगाव नगरपरिषदेचे नगरध्यक्ष विजय वहाडणे, जेष्ठ पत्रकार सुरेश रासकर, सौ. उमाताई वहाडणे, साईभक्त माधुरीताई शिंदे, प्रियदर्शनी महिला मंडळाच्या व साई मंजिरी प्रतिष्ठान कोपरगाव चे सर्व सदस्य व साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. या साई कथा महोत्सवात दररोज सायंकाळी ६.३० ते ७ या वेळेत साई संगीतमय स्तवन मंजिरीचा कार्यक्र्म तसेच साई कथा महात्म्य व ग्रंथ महात्म्य, श्री. साई कथा, बाबांचे अवतरण, पुनरागमन, गुरूस्थान महात्म्य, श्री. भिक्षा महात्म्य, ज्ञान, भक्ती पारायण, साईबाबा उदी माहात्म्य, हंडी माहात्म्य, साईकथा जीर्णोद्धार,चावडी मिरवणूक,साईबाबा रामनवमी, दिपावली उत्सव, साईबाबा महानिर्वाण (समाधी) व अकरा वचने आदी विषयी ह.भ.प.साई कथाकार कैलास महाराज राजगुरू यांच्या रसाळ वाणीतून श्रवण करण्याचा लाभ भाविकांना दैनदिन मिळणार आहे. या साई कथा महोत्सवामुळे संपूर्ण कोपरगाव शहराचा परिसर भक्तीमय वातावरणात न्हावून निघाला आहे.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram