भविष्यात मोबाईल व्यसनमुक्ती केंद्र उभारावे लागतील – सौ. पुष्पाताई काळे

सुरेगाव येथील रयत संकुलाच्या राधाबाई काळे कन्या विद्या मंदिर येथे सालाबादप्रमाणे याहीवर्षी स्व. सौ. सुशीलामाई काळे यांच्या स्मृतीदिनानिमित्त वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे हे १७ वे वर्ष असून याप्रसंगी आपल्या अध्यक्षीय भाषणात पुढे बोलतांना सौ. पुष्पाताई काळे म्हणाल्या की, राधाबाई काळे कन्या विद्या मंदिर पाहिले की, माजी खासदार स्व. कर्मवीर शंकरराव काळे व स्व. सौ. सुशीलामाई काळे यांनी मुलींच्या शिक्षणाचे पाहिलेले स्वप्न साकार झाल्याचे वाटते. वक्तुत्व स्पर्धेच्या या वाकयज्ञातून भविष्यातील उत्तम वक्ते तयार होणार आहेत. या स्पर्धेतील सहभागी प्रत्येक स्पर्धकाला बक्षीस मिळणार नाही असे असले तरी स्पर्धकांनी जिद्द न सोडता आपली लढाई सुरूच ठेवावी कारण लढण्याचा व लढत दिल्याचा आनंद मोठा असतो. या स्पर्धेत जरी बक्षीस जिंकता आले नाही तरी श्रोत्यांची मने मात्र नक्कीच जिंकणार आहात असे सांगत स्पर्धकांचा उत्साह द्विगुणीत केला. या स्पर्धेत एकूण ११५ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक रुपये २१००/- व प्रशस्तिपत्रक, द्वितीय पारितोषिक रुपये १५००/- व पारितोषिक व तृतीय पारितोषिक रुपये ११००/- व प्रशस्तिपत्रक व सांघिक पारितोषिके फिरता करंडक व प्रशस्तीपत्रक देण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी पहिलागट ७ वी ते ८ वी, दुसरा गट ९ वी ते १० वी व तिसरा गत ११ ते १२ वी असा असून पहिल्या गटाच्या विद्यार्थ्यांसाठी १) विद्यार्थी व मोबाईल २) चला खेळू या ३) त्यागमूर्ती रयत माऊली लक्ष्मीबाई भाऊराव पाटील, दुसरा गट १)स्पर्धा परीक्षेचे आवाहन २) सेंद्रिय शेती –काळाची गरज ३)स्व. सौ. सुशीलामाई काळे यांचे सामाजिक योगदान तृतीय गटासाठी `१)आजच्या शेतक-यांसमोर आव्हाने २)कायदा आणि स्त्री सऺरक्षण ३) बदलती अर्थव्यवस्था विषय ठेवण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक प्राचार्या श्रीमती देवरे जे. व्ही यांनी केले.तर परिचय व स्वागत पर्यवेक्षक एस. जी गायकवाड यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ए. व्ही. रुपवते यांनी तर आभार गोरखे एस. ए. यांनी मानले. स्पर्धेचे परीक्षक म्हणून सौ. विमल राठी, शिंदे आर. आर., होन वाय.पी., कांडेकर एस. पी., घोटेकर एस. पी., शिंदे एस. के., सोनवणे के. बी., कर्पे डी. एस यांनी काम पाहिले.याप्रसंग कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन सूर्यभान कोळपे, संभाजीराव काळे, कचरू कोळपे, छत्रपती शिवाजी विद्यालयाचे प्राचार्य मते एन. ए., मुख्याध्यापक राजेंद्र पाचोरे, सुरेगावचे माजी सरपंच सचिन कोळपे आदी मान्यवरांसह पालक, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram