तंत्रज्ञान अवगत करतांना संस्कृतीचा विसर पडू न देता विज्ञानाच्या सहाय्याने समाजातील अंधश्रद्धा दूर करा –आशुतोष काळे

आजचे युग हे विज्ञान युग आहे. या विज्ञान युगात नवनवीन तंत्रज्ञान अवगत करतांना आपण आपली संस्कृती व संस्काराचा विसर पडू देवू नये. एकीकडे बुध्दीच्या बळावर वैज्ञानिक क्षेत्रात मानवाने साधलेल्या अचाट प्रगतीचे चित्र दिसत असतांना दुसरीकडे समाजात मात्र अध्यात्माच्या नावाखाली दिवसेंदिवस वाढत चाललेली अंधश्रध्दा असे चित्र दिसते. त्याचे घातक परिणाम देशाच्या प्रगतीमध्ये अडथळा निर्माण करीत आहे. हे चित्र बदलून टाकण्यासाठी भावी वैज्ञानिकांनी विज्ञानाच्या सहाय्याने समाजातील अंधश्रद्धा दूर करावी असे प्रतिपादन कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते आशुतोष काळे यांनी विज्ञान–गणित व लोकसंख्या प्रदर्शनाच्या उदघाटन प्रसंगी केले. पंचायत समिती कोपरगाव व विज्ञान, गणित अध्यापक संघ यांचे वतीने कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी-सुरेगाव येथील श्री. छत्रपती शिवाजी माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयात ४३ वे विज्ञान, गणित व लोकसंख्या शिक्षण प्रदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे उदघाटन आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आले. आपल्या भाषणात बोलतांना ते पुढे म्हणाले की, कोपरगाव तालुक्यातील शाळेच्या विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता किती ठासून भरलेली आहे हे आजच्या प्रदर्शनातून जाणवत असून भविष्यात विज्ञानाचे आव्हान पेलण्याची ताकद व नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याची दूरदृष्टीची अनुभूती या प्रदर्शनातून येत असल्याचे सांगितले. देशाचे माजी राष्टपती थोर शास्त्रज्ञ स्व. डॉ. अब्दुल कलामांनी आपला भारत देश महासत्ता होण्याचे स्वप्न पाहिले आहे त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी या भावी वैज्ञानिकांनी आपल्या असामान्य बुद्धीचा उपयोग आपल्या देशाला जगात महासत्ता बनविण्यासाठी करावा असे आवाहन केले. आपले मनोगत व्यक्त करतांना जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे म्हणाले की, या भावी विद्यार्थ्यांमध्ये जर आपण आपले उद्याचे भविष्य या द्य्ष्टीकोनातून पाहत असतांना अशा उपक्रमांसाठी जिल्हा परिषद स्तरावर जास्तीत जास्त निधी देण्याचा प्रयत्न करीत असून यापूर्वी पंचायत समितीच्या माध्यमातून दिला जाणारा निधी मागील काही वर्षापासून बंद करण्यात आला आहे तो पूर्ववत सुरु व्हावा यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. कोपरगाव तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य एकदिलाने काम करीत आहोत त्याप्रमाणे पदाधिका-यांनीही एक विचाराने काम करून सहकार्य करावे असे सांगितले. तसेच आपला पाल्य काय करतो याची कल्पना पालकांना यावी यासाठी या प्रदर्शनाचा कालावधी वाढविला पाहिजे असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समितीच्या सभापती अनुसया होन होत्या. या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे, सुधाकर दंडवते, सौ. विमल आगवन, उपसभापति अनिल कदम, सदस्य गटनेते अर्जुन काळे, मधुकर टेके, पोर्णिमा जगधने, गटविकास अधिकारी कपिल कलोडे, गटशिक्षणाधिकारी शबाना शेख , कारभारी आगवन, राहुल रोहमारे, काळे कारखान्याचे संचालक सुनील शिंदे, सुरेगावचे सरपंच वाल्मिक कोळपे, प्राचार्य मते एन. ए., प्राचार्या ज्योती देवरे, मुख्याध्यापक राजेंद्र पाचोरे, आदी मान्यवरांसह विविध शाळांतील शिक्षक व विद्यार्थी, ग्रामस्थ व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी शबाना शेख यांनी केले. पाहुण्यांचा परिचय व स्वागत प्राचार्य मते यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजश्री पिंगळे यांनी केले तर आभार एस. डी. सातव यांनी मानले.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram