गोदाकाठ महोत्सवातून बचत गटाच्या महिलांना आर्थिक स्थैर्य - सौ. पुष्पाताई काळे

महिला प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करीत असून महिला सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहेत. हे महिलांनी वेळोवेळी सिद्ध केले आहे. महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून उद्योग व्यवसायात दाखविलेल्या आत्मविश्वासाला पाठबळ मिळावे व बचत गटाच्या महिलांना हक्काची बाजारपेठ मिळून महिलांना आर्थिक स्थैर्य गोदाकाठ महोत्सवाच्या माध्यमातून मिळत आहे असे प्रतिपादन प्रियदर्शनी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. पुष्पाताई काळे यांनी गोदाकाठ महोत्सव २०१८ च्या उदघाटन प्रसंगी केले. प्रियदर्शनी महिला मंडळ कोपरगाव यांचे वतीने महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्ट कोपरगाव येथे गोदाकाठ महोत्सव २०१८ चे आयोजन करण्यात आले. उदघाटन प्रसंगी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते आशुतोष काळे, प्रियदर्शनी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. पुष्पाताई काळे, जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका सौ. चैतालीताई काळे, स्टार प्रवाह फेम लक्ष्य मालिकेतील सिनेअभिनेत्री धनश्री क्षीरसागर, जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे, पंचायत समितीच्या सभापती अनुसया होन यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. आपल्या भाषणात बोलतांना सौ. पुष्पाताई काळे म्हणाल्या की, महिलांना सहजासहजी रोजगार उपलब्ध होत नाही. व्यवस्थापनाच्या बाबतीत महिला अतिशय हुशार असतात. महिलांना घरगुती छोट्या-मोठ्या व्यवसायाचे प्रशिक्षण मिळाल्यास या महिला चांगल्या प्रकारे व्यवसाय करू शकतात व या व्यवसायातून त्यांच्या संसाराला नक्कीच हातभार लागू शकतो. त्यामुळे गावागावात महिलांचे बचत गट स्थापन करून बचत गटाच्या महिलांना हक्काची बाजारपेठ मिळावी यासाठी फूड फेस्टिवल सुरु केले. या फूड फेस्टिवलला महिलांचा भरपूर प्रतिसाद मिळत गेला व याची व्याप्ती वाढत गेली. गोदावरी नदीच्या काठी हा महोत्सव भरतो म्हणून या फूड फेस्टिवल महोत्सवाला गोदाकाठ महोत्सव असे नाव देण्यात आले मागील काही वर्षापासून गोदाकाठ महोत्सव म्हणून संपूर्ण जिल्ह्यात प्रसिद्ध झाला असून लाखो रुपायांच्या उलाढालीतून यशस्वी महिला उद्योजक घडविण्याचे काम गोदाकाठ महोत्सव करीत असल्याचे सांगितले. या प्रसंगी जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका सौ. चैतालीताई काळे म्हणाल्या की, महिलांना समाजात स्वत:चे स्थान निर्माण करतांना अनंत अडचणी सहन कराव्या लागतात. बचत गटाच्या महिला प्रमाणिकपणे करीत असलेल्या कष्टाचे कौतुक समाजाने करणे गरजेचे आहे . या कौतुकातून बचत गटाच्या महिलांना त्यांना नवी उमेद प्राप्त होणार आहे. याच उमेदीतून त्यांना भविष्यात उद्योग व्यवसायात नवनवीन संधी मिळणार आहे व त्यांची आर्थिक उन्नती होणार असल्याचे सांगितले. बचत गटाच्या महिलांना गोदाकाठ महोत्सवातून मिळणारा आर्थिक लाभ यामुळे महिला बचत गट गोदाकाठ महोत्सवाची प्रतीक्षा करीत असल्याचे सांगितले. स्टार प्रवाह फेम लक्ष्य मालिकेतील सिनेअभिनेत्री धनश्री क्षीरसागर म्हणाल्या की, बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी तयार केलेले उत्पादन व हे उत्पादन स्पर्धेच्या युगात जगाच्या बाजारात विकतांना त्यांच्या चेहऱ्यावरील उत्साह पाहिल्यावर बचत गटाच्या माध्यमातून स्वतःचे अस्तित्व निर्माण करणारी प्रत्येक महिला सेलिब्रिटीच असल्याचे सांगितले. टी. व्ही. मालिकांमध्ये पोलीस इन्स्पेक्टर ची भूमिका करीत असतांना महिलांच्या समस्या व महिलांवर होणारे अत्याचार, महिलांना समाजात किती आव्हानांना सामोरे जावे लागते हे भूमिका साकारतांना अनुभवले असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते आशुतोष काळे, प्रियदर्शनी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. पुष्पाताई काळे, जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका सौ. चैतालीताई काळे, जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे, पंचायत समितीच्या सभापती अनुसया होन, नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी शिल्पा दरेकर,पोलीस उपनिरीक्षक श्रीमती अर्चना करपुडे, सौ. उमाताई वहाडणे, काळे कारखान्याचे सर्व संचालक, गौतम सहकारी बँकेचे संचालक, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे पदाधिकारी व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्व नगरसेवक कार्यकर्ते तसेच प्रियदर्शनी महिला मंडळाच्या सर्व सदस्या व बचत गटाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजश्री पिंगळे यांनी केले.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram