पंचायत समितीची नूतन इमारत कामाचा शुभारंभ ग्रामीण भागातील जनतेची स्वप्नपूर्ती – आशुतोष काळे

कोणत्याही शासकीय कार्यालयात गेल्यावर आपल्याला चांगल्या सुविधा मिळाव्या अशी प्रत्येक नागरिकांची इच्छा असते. त्यासाठी असणारे प्रशासकीय कार्यालय सर्व सोयींनी अद्यावत असावे लागते. हा विचार डोळ्यासमोर ठेवून माजी आमदार अशोकराव काळे यांनी त्यांच्या कार्यकाळात २०१३ मध्ये पंचायत समितीची नूतन इमारत व्हावी यासाठी ग्रामविकास मंत्रालयाकडे प्रस्ताव सादर करून सतत पाठपुरावा केला होता. त्या पाठपुराव्याला अपेक्षित यश मिळून आज नूतन इमारतीच्या नुतनीकरन व विस्तारीकरण कामाचा शुभारंभ होत आहे त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेची स्वप्नपूर्ती होऊन ग्रामीण भागाच्या विकासाला चालना मिळणार असल्याचे कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते आशुतोष काळे यांनी म्हटले आहे. कोपरगाव तालुका पंचायत समितीच्या नूतन इमारतीच्या कामाचा शुंभारंभ नुकताच प. पु. रमेशगिरी महाराज यांचे अनुयायी संदीपगिरी महाराज व युवा नेते आशुतोष काळे यांच्या शुभ हस्ते करण्यात आला याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे उपस्थित होते. ते पुढे म्हणाले की, माजी आमदार अशोकराव काळे यांनी त्यांच्या कार्यकाळात कोपरगाव शहराचा विकास करतांना तहसील कार्यालय, न्यायालय इमारत, ग्रामीण रुग्णालय, पशु वैद्यकीय दवाखाना आदी प्रशासकीय इमारती उभ्या करून कोपरगाव शहराच्या वैभवात भर घातली. तसेच गोदावरी नदीवर विविध ठिकाणी पूल बांधून दळणवळणाच्या समस्या सोडविल्या. जो विकास शहराचा केला तोच विकास ग्रामीण भागाचाही केला. विकासाच्या बाबतीत शहर व ग्रामीण भागाला समान न्याय दिला. ग्रामीण भागातील नागरिकांचे प्रश्न सुटावे व त्यांना चांगल्या सुविधा मिळाव्या यासाठी सातत्याने पंचायत समितीच्या नूतन इमारत व्हावी यासाठी पाठपुरावा केला. त्याचे फलित आज पंचायत समितीच्या नूतन इमारतीच्या नुतनीकरन व विस्तारीकरण कामाचा शुभारंभ होत असल्याचे सांगितले. एकून ६२७ स्क्वेअर मीटर परिसरात ही भव्यदिव्य प्रसासकीय इमारत कोपरगाव शहराच्या वैभवात भर पडणार आहे. यासाठी जवळपास ४ कोटी ८८ लाख रुपये खर्च होणार असून १८ महिन्याच्या आत या नूतन प्रशासकीय इमारतीमध्ये कामकाज सुरु होईल असा विश्वास आशुतोष काळे यांनी व्यक्त केला. याप्रसंगी गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे, पंचायत समितीच्या सभापती अनुसया होन, जिल्हा परिषद सदस्य सुधाकर दंडवते, सौ. विमल कारभारी आगवन, सौ. सोनाली राहुल रोहमारे, सौ. सोनाली प्रसाद साबळे, कारभारी आगवण, उपसभापति अनिल कदम, सदस्य अर्जुनराव काळे, मधुकर टेके, श्रावण आसने, सौ. पौर्णिमा राहुल जगधने, सौ. वर्षा नवनाथ दाणे, सौ. योगिता योगेश पवार, सौ. सुनिता कैलास संवत्सरकर तसेच पंचायत समितीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram