गोदाकाठ महोत्सव महिलांना प्रगती शिखराकडे घेवून जाणारे – आशुतोष काळे

दरवर्षी गोदाकाठ महोत्सवाला महिला बचत गटांचा मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद महिलांना आर्थिक दृष्ट्‍या सक्षम करीत असून हा गोदाकाठ महोत्सव महिलांना प्रगतीच्या शिखराकडे घेवून जात आहे असे प्रतिपादन कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते आशुतोष काळे यांनी केले.प्रियदर्शनी महिला मंडळ कोपरगाव यांचे वतीने महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्ट कोपरगाव येथे गोदाकाठ महोत्सव २०१८ चे आयोजन करण्यात आले होते. दिनांक ५ जानेवारी २०१८ ते ८ जानेवारी २०१८ या कालावधीत कोपरगाव तालुक्यातील विविध महिला बचत गटांनी आपल्या तयार मालाचे स्टॉलस थाटले होते. गोदाकाठ महोत्सव सांगता समारोपात या बचत गटाच्या महिलांना युवा नेते आशुतोष काळे यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देवून सत्कार करण्यात आला या प्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी प्रियदर्शनी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ.पुष्पाताई काळे व जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका सौ.चैतालीताई काळे उपस्थित होत्या. या गोदाकाठ महोत्सवात जवळपास १२५ महिला बचत गटांचे स्टॉलस लावण्यात आले होते. प्रत्येक स्टॉलसवर असलेल्या महिला त्यांनी तयार केलेल्या मालाची माहिती ग्राहकांना सांगतांना त्यांच्या चेह-यावरील आत्मविश्वास ओसंडून वाहतांना दिसत होता. या महिलांमध्ये एक यशस्वी उद्योजक घडत असल्याची ग्वाही या आत्मविश्वासातून मिळाली. गोदाकाठ महोत्सवाच्या आयोजक प्रियदर्शनी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ.पुष्पाताई काळे व जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका सौ.चैतालीताई काळे यांनी महिला बचतगटांच्या महिलांना अतिशय कमी दरात ना नफा ना तोटा या धर्तीवर स्टॅाल्स उपलब्ध करून दिले. त्यामुळे मागील वर्षाप्रमाणेच यावर्षीही महिला बचत गटांचा मोठा प्रतिसाद या गोदाकाठ महोत्सवाला मिळाला.महिला बचत गटाच्या तयार मालाची खरेदी करण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. चार दिवसाच्या कालावधीत या गोदाकाठ महोत्सवात ३५ लाखाच्या वर उलाढाल झाली असून खरेदी करण्यासाठी आलेल्या ग्राहकांना बचत गटाचे विविध घरगुती उत्पादने अतिशय स्वस्त दरात मिळत असल्यामुळे ग्राहकांची गर्दी वाढत होती. या गोदाकाठ महोत्सवाच्या माध्यमातून महिला बचत गटांच्या महिलांचे आर्थिक उत्पन्न वाढणार आहे.त्यामुळे महिला ख-या अर्थाने सबला आणि सक्षम होणार असून या गोदाकाठ महोत्सवाच्या माध्यमातून कोपरगाव तालुक्यातील महिला बचत गटांना ख-या अर्थाने सक्षम करण्याचा उद्देश सफल होऊन महिला बचत गटांचा आणि महिलांचा उत्कर्ष होणार आहे. कोपरगाव तालुक्यातील महिला बचत गटाच्या तयार मालाला गोदाकाठ महोत्सव हक्काचे व्यासपीठ झाले आहे. त्यामुळे या गोदाकाठ महोत्सवाच्या माध्यमातून बचत गटाच्या महिलांचा उत्साह द्विगुणीत झाला असून भविष्यात गोदाकाठ महोत्सवाच्या माध्यमातून महिला उद्योजक घडणार यात कुठलिही शंका नाही.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram