जनतेचे आशीर्वाद पाठीशी असल्यामुळे सामाजिक कार्याला ऊर्जा मिळते – आशुतोष काळे

सहकार क्षेत्रात अग्रगण्य असण-या कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याची जबाबदारी सांभाळत असतांना तसेच सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रात काम करीत असतांना कोपरगाव तालुक्यातील जनतेचे मिळत असलेले सहकार्य, प्रेरणा व आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत. कोपरगाव तालुक्याच्या जनतेचे आशिर्वाद माझ्या पाठीशी असल्यामुळे मला सामाजिक क्षेत्रात काम करत असतांना एक ऊर्जा मिळत असून या उर्जेच्या जोरावरच मला विविध संस्थांवर काम करण्याची संधी मिळत आहे असे प्रतिपादन कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्या चेअरमन युवा नेते आशुतोष काळे यांनी केले. पोहेगाव ग्रामस्थ व परीसरातील नागरिकांच्या वतीने आशुतोष काळे यांची रयत शिक्षण संस्था जनरल बॉडी सदस्य, दि डीस्टीलर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र चे उपाध्यक्ष, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूगव्हर्निंग कौन्सिल सदस्यपदी निवड झाल्याबद्दल व इंटीग्रेशन पीस इन्स्टिट्यूट यांच्या वतीने दिला जाणारा डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम एक्सलंस पुरस्कार मिळाल्याबद्दल भव्य नागरी सत्कार आयोजित करण्यात आला होता. यावेळी सत्काराला उत्तर देतांना त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. पोहेगाव ग्रामस्थांच्या प्रेमामुळे मी भारावून गेलो आहे. हा सत्कार माझा नसून पोहेगाव ग्रामस्थांच्या विश्वासाचा असल्याचे आशुतोष काळे म्हणाले. सामाजिक, राजकीय क्षेत्रात काम करीत असतांना सर्वांना सोबत घेवूनच या पोहेगाव व परिसराचा तसेच कोपरगाव तालुक्याचा सर्वांगीण विकास करून हा संपूर्ण कोपरगाव तालुका सुजलाम सुफलाम करायचा आहे. त्यासाठी आपले प्रेम, सहकार्य व आशीर्वाद असेच माझ्या पाठीवर कायम ठेवा असे भावनिक आवाहन त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित असणा-या पोहेगाव ग्रामस्थांना केले. याप्रसंगी सौ. पुष्पाताई काळे, पंचायत समितीच्या सभापती सौ. अनुसया होन, उपसभापति अनिल कदम, जिल्हा परिषद सदस्य सुधाकर दंडवते, सौ. सोनाली राहुल रोहमारे, कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोक रोहमारे, एम. टी. रोहमारे, चंद्रकांत औताडे, मधुकर औताडे, नरहरी रोहमारे, नानासाहेब औताडे, निवृत्ती शिंदे, भाऊसाहेब रोहमारे, उत्तमराव औताडे, अविनाश वाके, वाल्मिक नवले, नंदकुमार औताडे, सुनीलआबा शिंदे, राहूल रोहमारे, सचिन रोहमारे, देवेन रोहमारे, जयंत रोहमारे आदी मान्यवरांसह पोहेगाव ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पोहेगाव परिसर व परीसरातील २२ गावातील नागरिकांच्या समस्या तातडीने सुटाव्या यासाठी आशुतोष काळे संपर्क कार्यालयाचे उदघाटन करण्यात आले.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram