रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान – सौ. चैतालीताई काळे | स्व.सौ.सुशीलामाई काळे यांच्या पुण्यस्मरणार्थ रक्तदान शिबिरात ७५ रक्तदात्यांनी केले रक्तदान

आजच्या काळात वाढते अपघात आणि विविध आजारांमुळे मानवी रक्ताच्या मागणीमध्ये सातत्याने वाढ होत आहे. स्वेच्छेने रक्तदान करणा-या रक्तदात्यांची संख्याही कमी झाली आहे. रक्त कोणत्याही कारखान्यात तयार होत नसून हे फक्त मानवी शरीरातच तयार होते. रक्तदान शिबिराच्या माध्यमातून रक्तदात्यांनी केलेले रक्तदान गरजू व्यक्तींचे प्राण वाचवून त्या व्यक्तीला जीवनदान देते त्यामुळे रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे असे प्रतिपादन अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका सौ. चैतालीताई काळे यांनी केले. कर्मवीर शंकरराव काळे एज्यूकेशन सोसायटीच्या गौतम पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट व श्री. साईबाबा संस्थान रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. सौ. सुशीलामाई काळे यांच्या १९ पुण्यस्मरणार्थ आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराचे उदघाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. या रक्तदान शिबिरात ७५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. दान अनेक प्रकारचे आहेत. त्या पुढे म्हणाल्या की, रक्तदान सोडले तर सर्वच दान संपणारे असून केवळ रक्तदान हे निरंतर टिकणारे आहे. त्यामुळे रक्तदान जगात सर्वात श्रेष्ठ दान आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे. आरोग्य चांगले असेल तरच अभ्यासावर लक्ष केंद्रित होऊ शकते. आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी दैनदिन आहारात पालेभाज्या व फळभाज्यांचा समावेश करा असा मौलिक सल्ला त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना दिला. याप्रसंगी श्री. साईबाबा संस्थान रक्तपेढीच्या संचालिका डॉ. सौ. सुनिता कडू यांनी रक्तदानाचे फायदे व रक्तदानाविषयी असलेले गैरसमज समजावून सांगितले. याप्रसंगी गौतम पब्लिक स्कूलचे प्राचार्य नूर शेख, गौतम पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूटचे प्राचार्य सुभाष भारती, ऑफिस सुपरिटेंडेट बाबासाहेब बढे, सर्व विभाग प्रमुख, तसेच रक्त पेढीचे रक्त संक्रमण अधिकारी डॉ. मिलिंद आराक, डॉ. सागर भगत, डॉ. विजया निर्मळ आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अतुल नीळकंठ यांनी केले तर आभार कु. अर्चना माळी हिने मानले.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram