सत्कारामुळे जबाबदारी वाढत असल्याची जाणीव - आशुतोष काळे

कोपरगाव विधानसभा मतदार संघातील जनतेचे मिळत असलेले प्रेम, सहकार्य व आशीर्वादाच्या जोरावर तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्याची प्रेरणा मिळत असून मला विविध नामांकित संस्थांवर काम करीत असण्याची मिळत असलेली संधी व मिळत असलेले पुरस्कार हे जनतेच्या प्रेमाचे प्रतीक असून होत असलेल्या सत्कारामुळे माझी जबाबदारी निश्चित वाढली असल्याची जाणीव होत असल्याचे कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते आशुतोष काळे यांनी राहाता तालुक्यातील वाकडी येथे जाहीर नागरी सत्काराला उत्तर देतांना म्हटले. .वाकडी ग्रामस्थ व परीसरातील नागरिकांच्या वतीने आशुतोष काळे यांची रयत शिक्षण संस्था जनरल बॉडी सदस्य, दि डीस्टीलर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र चे उपाध्यक्ष, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट गव्हर्निंग कौन्सिल सदस्यपदी निवड झाल्याबद्दल व इंटीग्रेशन पीस इन्स्टिट्यूट यांच्या वतीने दिला जाणारा डॉ.ए.पी. जे. अब्दुल कलाम एक्सलंस पुरस्कार मिळाल्याबद्दल वाकडी ग्रामस्थ व परिसरातील नागरिकांच्या वतीने आशुतोष काळे यांचा भव्य जाहीर नागरी सत्कार करण्यात आला याप्रसंगी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, कोपरगाव विधानसभा मतदार संघाला जोडलेल्या राहाता तालुक्यातील ११ गावातील नागरिकांनी जे प्रेम व सहकार्य माजी आमदार अशोकराव काळे यांना दिले तेच प्रेम व सहकार्य मलाही द्या. कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचा सर्वागीण विकास करण्यासाठी मला तुमच्या सहकार्याची व आशिर्वादाची गरज आहे. तुमच्या सहकार्याने वाकडी परिसर व कोपरगाव विधानसभा मतदार संघाचा सर्वागीण विकास करू असा उपस्थितांना विश्वास दिला. या प्रसंगी गौतम सहकारी बँकेचे चेअरमन बाबासाहेब कोते, तालुकाध्यक्ष सुधीर म्हस्के, मुरलीधर थोरात, दिलीप चौधरी, दिपक वाघ, नंदकुमार सदाफळ, शशिकांत लोळगे, वाकडीचे सरपंच संपतराव शेळके, सदस्य जालिंदर कोते, अनिल कोते,मुरलीधर शेळके, दत्तात्रय कोते, त्र्यम्बक लहारे, शंकर लहारे, कल्याण सदाफळ, बाबासाहेब डोखे, वसंत डोखे, किशोर एनगे, आण्णासाहेब कोते, भागचंद शेळके, सुरेश लहारे, विठ्ठल शेळके, प्रभाकर येलम आदी मान्यवरांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी विठ्ठल गाढवे, सोपानराव गोरे , पिराजी गोरे, बाळाजी गोरे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. या कार्यकर्त्यांचे युवा नेते आशुतोष काळे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष सुधीर म्हस्के यांनी सत्कार करून स्वागत केले. यावेळी अण्णासाहेब कोते व भागचंद शेळके यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विठ्ठल शेळके यांनी केले.सूत्रसंचालन व आभार प्रभाकर येलम यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दतात्रय कोते व जालिंदर कोते यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व वाकडी ग्रामस्थ व परिसरातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram