दर्जेदार शिक्षण देणारी शिक्षणाची पंढरी उभारणार –आशुतोष काळे

माजी खासदार स्व. शंकररावजी काळे साहेबांनी ग्रामीण भागातील कष्टकऱ्यांच्या व शेतकऱ्यांच्या मुलांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण मिळावे म्हणून कर्मवीर एज्युकेशन सोसायटीची स्थापना करून गौतम पब्लिक स्कुल सुरु केले. या एज्युकेशन सोसायटीचे वटवृक्षात रूपांतर होऊन ही एज्युकेशन सोसायटी आज कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटी या नावाने ओळखली जात असून या संस्थेने शैक्षणिक क्षेत्रात आपले आगळे वेगळे स्थान निर्माण केले आहे. संस्थेचे उच्च माध्यमिक विद्यालय, गौतम पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट व विविध माध्यमिक विद्यालयात ग्रामीण भागातील विद्यार्थी आपले शिक्षणाचे स्वप्न करीत आहे.पण आता यावरच थांबणे संयुक्तिक नसून भविष्यात या संस्थेच्या माध्यमातून एकाचवेळी १५ हजार विद्यार्थी विविध प्रकारचे व्यावसायिक दर्जेदार शिक्षण घेवू शकतील अशी शिक्षण पंढरी उभारणार असल्याचा आपला मानस आहे असे कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त युवा नेते आशुतोष काळे यांनी सांगितले. कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या गौतम पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट मध्ये गौतम फेस्टिव्हल २०१८ च्या पारितोषिक वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, आपला परिसर ग्रामीण भागातील असूनही उच्च दर्जाचे शिक्षण देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आजपर्यंत आपण करीत आलो आहे. पुढील वर्षी सर्व सोयी सुविधांनीयुक्त अशा नव्या इमारतीमध्ये गौतम पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांना शहरातील महाविद्यालयाचा अनुभव मिळणार असला तरी यावरच न थांबता एकाचवेळी जवळपास १५ हजार विद्यार्थ्यांना व्यावसायिक दर्जेदार शिक्षण उपलब्ध होऊ शकेल तसेच शहरातील महाविद्यालयांप्रमाणे सुविधा देऊन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना एकाच छताखाली सर्वप्रकारचे शिक्षण व सुविधा निर्माण करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शिक्षणाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे सांगितले.याप्रसंगी झी मराठी हास्यसम्राट उपविजेते हास्यसम्राट प्रकाश भागवत प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच संस्थेचे उपाध्यक्ष छबूराव आव्हाड, सभापती अनुसया होन, कारभारी जाधव, कारभारी आगवन, कर्मवीर काळे कारखान्याचे संचालक बाळासाहेब बारहाते, सुनील शिंदे, अरुण चंद्रे, जिल्हा परिषद सदस्य सुधाकर दंडवते, संस्थेचे विश्वस्त भास्करराव आवारे, सिकंदर पटेल,चंद्रकांत औताडे, पुंडलिक माळी, रोहिदास होन, रणजित जगताप, साहेबराव भोसले, चांदभाई पठाण, राजेंद्र भाकरे, .सुशिलामाई काळे महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.सौ.विजया गुरसळ, ऑफिस सुप्रिटेंडेन्ट बाबासाहेब बढे, आदी मान्यवर उपस्थित होते..कार्यक्रमाचे प्रास्तविक करतांना महाविद्यालयाचे प्राचार्य सुभाष भारती यांनी पाहुण्यांचे स्वागत करून महाविद्यालयाच्या प्रगतीची महिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सौ. देशमुख व प्रा. अतुल नीळकंठ यांनी केले. युवा नेते आशुतोष काळे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या कला, गुणांनी उपस्थित हजारो रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram