सकारात्मक विचार करा, यश हमखास मिळेल – आशुतोष काळे

मनात ठरविलेली कोणतीही गोष्ट साध्य करायची असेल सकारात्मक विचार करणे गरजेचे असून सकारात्मक विचार असले तर या जगात कोणतीही गोष्ट अशक्य नाही. तुम्ही सकारात्मक विचार करा तुम्हाला यश हमखास मिळेल असे प्रतिपादन कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते आशुतोष काळे यांनी स्व. सौ. सुशिलामाई काळे यांच्या स्मृती प्रित्यर्थ राधाबाई काळे कन्या विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय कला व विज्ञान कोळपेवाडी येथे वक्तृत्व स्पर्धेच्या बक्षीस वितरण व वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रमाप्रसंगी आपल्या अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते. याप्रसंगी कोपरगाव पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षक कु. अर्चना करपुडे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. ते पुढे म्हणाले की, माई आजी अर्थात स्व. सौ. सुशीलामाई काळे यांच्या आग्रहास्तव मुलींसाठी स्वतंत्र शाळा, महाविद्यालय माजी खासदार स्व. शंकररावजी काळे साहेबांनी सुरु करून मुलींच्या शिक्षणाचा प्रश्न सोडविला. हे शाळा महाविद्यालय काळे परिवाराच्या कुटुंबातील घटक असून या शाळांकडे आदर्श महाविद्यालय म्हणून पहिले जाते. प्रत्येक विद्यार्थिनींनी ध्येयवेडेपणा अंगीकारून सकारात्मक विचारांच्या साथीने यशाची शिखरे सर करावी. सर्व प्रकारच्या स्पर्धेत भाग घेवून प्राविण्य मिळवावे जोपर्यंत तुम्ही यशाला गवसणी घालत नाही तो पर्यंत प्रयत्न करीत राहा. मनात इच्छा असेल व त्याला प्रयत्नांची जोड मिळाल्यास सर्व काही शक्य असल्याचा मौलिक संदेश आशुतोष काळे यांनी दिला. यावेळी विदायार्थीनिंशी संवाद साधतांना कोपरगाव पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षक कु. अर्चना करपुडे म्हणाल्या की, शिक्षण घेत असतांना आपल्याला भविष्यात काय व्हायचे हे सांगण्याचे धाडस प्रत्येक मुलींमध्ये निर्माण होणे गरजेचे आहे. प्रत्येक मुलीने आपण सुंदर कसे दिसू यापेक्षा आपण सर्व प्रकारच्या प्रसंगाना सामोरे कसे जावू शकतो याची तयारी ठेवून सुंदर दिसण्यापेक्षा सक्षम होणे गरजेचे असल्याचे सांगितले. महिलांना प्रत्येक क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध असून मुलीनी भविष्यात यु. पी. एस. सी. व एम. पी. एस. सी. परीक्षेच्या माध्यमातून ध्येय गाठावे असा सल्ला दिला याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून कोपरगाव पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षक कु. अर्चना करपुडे, संभाजीराव काळे, कचरू कोळपे, रामनाथ काळे, एल. आय. सी. अधिकारी, प्रशांत वाबळे, शैलेश तोताडे, जनार्दन कोळपे, छत्रपती शिवाजी विद्यालयाचे प्राचार्य मते एन. ए., छत्रपती संभाजी विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र पाचोरे, पर्यवेक्षक गायकवाड एस. जी. आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक प्राचार्या श्रीमती ज्योती देवरे, स्वागत व परिचय पर्यवेक्षक गायकवाड एस. जी. यांनी केले. सूत्रसंचालन उपशिक्षक रुपवते ए. व्ही. यांनी केले तर आभार उपशिक्षक गोरखे एस.ए. यांनी मानले. याप्रसंगी शिक्षक-शिक्षिका, विद्यार्थिनी व त्यांचे पालक मोठया संख्येने उपस्थित होते.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram