स्मार्ट ग्राम पुरस्कार मिळाल्याबद्दल भोजडे ग्रामपंचायतीच्या सदस्यांचा आशुतोष काळे यांच्या हस्ते सन्मान

कोपरगाव तालुक्यातील भोजडे ग्रामपंचायतीने महाराष्ट्र शासनाच्या वतीने स्मार्ट ग्रामनिवडीचे सर्व निकष पूर्ण करून महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून दिला जाणारा २०१७-१८ चा स्मार्ट ग्राम पुरस्कार मिळविला. याबद्दल कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते आशुतोष काळे यांनी त्यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या. भोजडे ग्रामपंचायतीच्या पदाधिका-यांनी हा पुरस्कार मिळविण्यासाठी शासनाचे सर्व निकष पूर्ण करतांना संपूर्ण गावामध्ये स्वच्छता उपक्रम राबवून वैयक्तिक शौचालय सुविधा व वापर, सार्वजनिक इमारतीमधील शौचालय सुविधा व वापर, पाणी गुणवत्ता तपासणी, सांडपाणी व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन केले आहे. तसेच पायाभूत सुविधांचा विकास करतांना आरोग्य व शिक्षण विषयक सुविधा, केंद्र व राज्य पुरस्कृत योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून संपूर्ण गाव प्लास्टिकमुक्त केले आहे. ग्रामपंचायतीच्या घरपट्टी, पाणीपट्टी वसुली व पथदिव्यांसाठी वापरण्यात येणा-या विजेचे देयके नियमितपणे जमा केले आहेत. सौर पथदिवे, बायोगॅस सयंत्राचा वापर, पर्यावरण संरक्षण करण्यासाठी वृक्ष लागवड व जलसंधारणाची कामे केली. भोजडे गाव सर्वच बाबतीत स्वयंपूर्ण करण्यासाठी घेतलेल्या प्रामाणिक परिश्रमाचे भोजडे ग्रामपंचायतीच्या पदाधिका-यांचे व ग्रामस्थांचे युवा नेते आशुतोष काळे यांनी कौतुक करून त्यांचे अभिनंदन केले. याप्रसंगी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर, सरपंच सौ. रतनबाई सिनगर, सदस्य पवन सिनगर, वाल्मिक सिनगर, दत्तात्रय घनघाव, अनिल धट, ग्रामविकास अधिकारी संग्राम बोर्डे, दत्तात्रय सिनगर, फारूक पटेल, दगू पवार, आदी मान्यवर उपस्थित होते.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram