विकासाचे प्रश्न सोडविण्यासाठी सर्वोतोपरी मदत करणार – आशुतोष काळे

आपल्या गावाचा सर्वागीण विकास करण्यासाठी शासनाच्या विविध योजनांचा तळागाळातील लाभार्थ्यांपर्यंत घेवून जा. सर्वांनी एकत्र येवून गावाच्या विकासासाठी प्रयत्न करा. कोणतीही अडचण, प्रश्न असेल तर निसंकोच पणे मला सांगा तुमचे विकासाचे प्रश्न सोडविण्यासाठी माझी सर्वोतोपरी मदत राहील असे प्रतिपादन कर्मवीर शंकरराव काळे सहकारी कारखान्याचे चेअरमन युवा नेते आशुतोष काळे यांनी कोपरगाव तालुक्यातील कोळगाव थडी येथे विविध विकास कामांचे उदघाटन प्रसंगी केले. कोळगावथडी ग्रामपंचायतीला प्राप्त झालेल्या १४ व्या वित्त आयोगातून विविध विकास कामांचा शुभारंभ होत आहे. यामध्ये ग्रामपंचायत कार्यालयासमोर पेव्हर ब्लॉक बसविणे २,२०,०००/-, रस्ता काँक्रिटिकरण करणे २,९०,०००/-, पाईप लाईन विस्तारीकरण करणे १,२०,०००/- आदी विकास कामांचा शुभारंभ युवा नेते आशुतोष काळे यांच्या शुभहस्ते झाला. याप्रसंगी बोलतांना ते पुढे म्हणाले की, कोळगाव थडी ग्रामस्थांनी नेहमीच काळे कुटुंबावर भरभरून प्रेम केले आहे माजी खासदार स्व. कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांनी नेहमीच कोळगाव थडी ग्रामस्थांच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य दिले आहे. त्यांचा वारसा माजी आमदार अशोकराव काळे यांनी पुढे चालवला आहे. त्यांच्या कार्यकाळात कोळगावथडी ग्रामस्थांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटावा व महिलांच्या डोक्यावरील हंडा कायमचा खाली उतरावा यासाठी मुख्यमंत्री पेयजल योजनेच्या माध्यमातून जवळपास बावन्न लाखाच्या पाणी योजनेसाठी प्रस्ताव सादर करून पाठपुरावा केला होता. या योजनेचे काम काही दिवसात सुरु होऊन कोळगाव थडी ग्रामस्थांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचासुटणार असल्याचे समाधान मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. कोळगाव थडीच्या स्मशान भूमीची अडचण लक्षात घेवून ही पण समस्या आपण सोडविली आहे. सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविणे काळे कुटुंबाचे दायित्व असून माजी खासदार स्व. शंकररावजी काळे व माजी आमदार अशोकराव काळे यांचा समाजकारणाचा वसा व वारसा यापुढेही असाच सुरु राहील असा विश्वास उपस्थीतांना दिला. याप्रसंगी शरद पवार पतसंस्थेचे माजी संचालक गंगाधर चव्हाण, गेणुजी शिंदे, बाबुराव निंबाळकर, पुंजाजी राऊत, कोळगाव थडीच्या सरपंच सौ. शामल लुटे, उपसरपंच आप्पासाहेब जाधव, सदस्या सौ. संगिता निंबाळकर, विठ्ठल जगताप, माजी सरपंच शिबाजी निंबाळकर, गुलाबराव निंबाळकर, माधवराव जाधव, नानासाहेब पंडोरे, अॅड.शपिक शेख, नंदकिशोर निंबाळकर, राजाराम निंबाळकर, तंटामुक्ती अध्यक्ष शिवाजी निंबाळकर, दिनकर वाकचौरे, शामराव मेहेरखांब, भाऊसाहेब लुटे, विलास निंबाळकर, कैलास लुटे, हुसेन शेख आदी मान्यवरांसह कोळगाव थडी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना ग्रामविकास अधिकारी भानुदास दाभाडे यांनी सुरु होणा-या व प्रस्तावित असणा-या विकास कामांची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅड.शपिक शेख यांनी केले तर आभार नंदकिशोर निंबाळकर यांनी मानले.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram