काळे परिवार कर्मवीरांचा वसा जपत आहे – सौ.मीनाताई जगधने

रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रेरणेतून माजी खासदार स्व. शंकररावजी काळे साहेबांनी ग्रामीण भागातील मुलींच्या दारात शिक्षणाची गंगा नेवून ठेवली. साहेबांच्या निधनानंतर माजी आमदार अशोकराव काळे, युवा नेते आशुतोष काळे यांनी व त्यांच्या परिवाराने हा शिक्षणाचा यज्ञ अखंडपणे सुरु ठेवला असून ख-या अर्थाने काळे परिवार कर्मवीरांचा वसा जपत आहे असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेच्या मनेजिंग कौन्सिल सदस्या सौ. मीनाताई जगधने यांनी केले. कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या सौ. सुशीलामाई काळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते आशुतोष काळे होते. बोलतांना त्या पुढे म्हणाल्या की, १९७५ ते १९९० या कार्यकाळात स्व. शंकररावजी काळे साहेबांनी रयत शिक्षण संस्थेच्या चेअरमनपदाची जबाबदारी पार पाडत असतांना दया, भावना, प्रेम मनात ठेवून अहमदनगर जिल्ह्याचा उत्तर विभाग शिक्षणाच्या बाबतीत सर्वगुण संपन्न केला. कर्मवीरांची प्रेरणा घेवून काळे परिवाराने या परिसरातील मुलींच्या उच्च शिक्षणाची सोय केली त्यामुळे या परिसरातील मुली खरोखर भाग्यवान असल्याचे त्यांनी सांगितले. वक्तृत्व कला आत्मसात करण्यासाठी भाषा, संस्कृतीचे उत्तम ज्ञान आत्मसात करा. उत्तम वक्त्याच्या ज्ञान शक्तीपुढे श्रोते नतमस्तक होतात असे सांगून महाविद्यालयात होत असलेल्या वक्तृत्व स्पर्धा व महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या मुलांपेक्षा मुलींची संख्या जास्त असल्याबद्दल कौतुक केले. आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलतांना युवा नेते आशुतोष काळे म्हणाले की, आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे. सर्वच क्षेत्रात स्पर्धा आहेत. या स्पर्धेच्या युगात आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास व विशिष्ट कला अवगत असणे आवश्यक आहे. यामध्ये आपले विचार जनसमुदायाला सांगणे किंवा पटवून देण्याच्या वक्तृत्व कलेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. वक्तृत्व कलेला प्रत्येक क्षेत्रात चांगल्या संधी उपलब्ध आहे. वक्तृत्व कला अवघड असली तरी तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये चांगला बदल घडवून तुम्हाला विशिष्ट अशा उंचीवर घेवून जाणारी कला असल्याचे सांगितले. वक्तृत्व कला प्रत्येकाने आत्मसात करा तुमचे भविष्य नक्कीच उज्वल होईल असा विश्वास त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना दिला. याप्रसंगी सोसायटीचे विश्वस्त सिकंदर पटेल, प्राचार्या डॉ. सौ. विजया गुरसळ प्रा. डॉ. शीला गाढे, प्रा. छाया शिंदे, मुख्याध्यापक राजेंद्र पाचोरे, परीक्षक प्रा. डॉ. शांताराम चौधरी, प्राचार्य विठ्ठल जाधव, प्रा. आकाश पंडित आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्या डॉ. सौ. विजया गुरसळ यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रा सिकंदर शेख, सूत्रसंचालन प्रा. निर्मला कुलकर्णी व प्रा. उमाकांत कदम यांनी केले तर आभार विद्यापीठ प्रतिनिधी श्रीनाथ वाबळे यांनी मानले. याप्रसंगी विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram