कर्मवीर काळे कारखान्याची जिल्हा सहकारी बँकेला सहकार्याची परंपरा आजही कायम – सौ. चैतालीताई काळे

माजी खासदार स्व. शंकररावजी काळे साहेब, माजी आमदार अशोकराव काळे यांनी अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेला कारखाना स्थापने पासून सदैव सहकार्य केले असून ही सहकार्याची परंपरा कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते आशुतोष काळे यांनी आजही कायम ठेवली असल्याचे प्रतिपादन जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका सौ. चैतालीताई काळे यांनी केले. कर्मवीर शंकराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर नुकतेच अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या एटीएम चे उदघाटन बँकेच्या संचालिका सौ. चैतालीताई काळे यांच्या शुभहस्ते करण्यात आले याप्रसंगी त्या बोलत होत्या. कोपरगाव तालुक्यातून अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेला सर्वात जास्त नफा मिळवून देणारी शाखा असा नावलौकिक असणा-या कारखाना कार्यस्थळावर असलेल्या जिल्हा सहकारी बँकेच्या ग्राहक असलेल्या शेतकरी, शिक्षक, कामगार यांना बँकेमध्ये आर्थिक व्यवहार करतांना या ग्राहकांचा त्रास कमी व्हावा व चांगली सेवा मिळावी यासाठी माजी आमदार अशोकराव काळे व युवा नेते आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना कार्यस्थळावर एटीएम सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी विशेष प्रयत्न केले होते. त्या प्रयत्नांना यश येवून कारखाना कार्यस्थळावर अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे एटीएम सुरु झाले आहे. या एटीएमसाठी कारखान्याचे चेअरमन युवा नेते आशुतोष काळे यांनी जागा उपलब्ध करून दिली आहे. शेतकरी, शिक्षक , व्यापारी सर्वांचे व्यवहार ऑनलाईन पद्धतीने सुरु आहे. जिल्हा सहकारी बँकेचे एटीएम सुरु झाल्यामुळे सर्वानांच दिलासा मिळाला असून २४ तास अविरतपणे सेवा मिळणार असल्यामुळे बँक पंचक्रोशीतील बँक ग्राहकांमध्ये समाधान पसरले आहे. या जिल्हा सहकारी बँकेचे एटीएम उदघाटन प्रसंगी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक विश्वासराव आहेर, राजेंद्र घुमरे, कार्यकारी संचालक गिरीश जगताप, जनरल मॅनेजर ए. व्ही. काळे. आसवनी विभागाचे जनरल मॅनेजर जयंतराव भिडे, सेक्रेटरी सुनील कोल्हे, ऑफिस सुपरिटेंडेंट बी.बी. सय्यद, कोपरगाव तालुका विकास अधिकारी कैलास गवळी, शाखाधिकारी सुनील गाडे, शरद पवार पतसंस्थेचे मॅनेजर बाळासाहेब काळे, संभाजी विद्यालायचे मुख्याध्यापक राजेंद्र पाचोरे आदी मान्यवरांसह बँकेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram