यशाचा हार गळ्यात पडण्यासाठी हजारो प्रहार सोसावे लागतात स्व. काळे साहेबांची कर्मभूमी महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्र – गीतकार बाबासाहेब सौदागर

विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्याकडे नेहमी सकारात्मक दृष्टीकोनातून पाहिले पाहिजे. आपल्या आयुष्यातील ध्येय अगोदर निश्चित करून आपल्याला यश मिळणारच आहे हा दृष्टीकोन नेहमी डोळ्यासमोर ठेवा त्याचबरोबर यशाचा हार गळ्यात पडण्यासाठी हजारो प्रहार सोसावे लागतात याचीही जाणीव ठेवा असा मौलिक संदेश सुप्रसिद्ध चित्रपट गीतकार, पटकथा लेखक चरित्र अभिनेते बाबासाहेब सौदागर यांनी कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथील सौ. सुशीलामाई काळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात उपस्थित विद्यार्थ्यांना वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रम प्रसंगी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या सचिव सौ. चैतालीताई काळे होत्या. याप्रसंगी सुप्रसिद्ध चित्रपट गायिका सौ. कविता सौदागर, सोसायटीचे विश्वस्त कारभारी जाधव, कारभारी आगवन, भास्करराव आवारे, सिकंदर पटेल आदी मान्यवर उपस्थित होते. सौदागर पुढे म्हणाले की, संपूर्ण महाराष्ट्रात रयत शिक्षण संस्थेचे नाव घेताच माजी खासदार स्व. शंकररावजी काळे साहेबांचे नाव पुढे येते. गोरगरीब घरातील मुले स्व. काळे साहेबांनी रयत मध्ये आणली. कलावंताचा व गुणवंतांचा सत्कार करण्याची स्व. काळे साहेबांची परंपरा आजही काळे कुटुंबाकडून अविरतपणे सुरु आहे. स्व. साहेबांची कर्मभूमी महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या तीर्थक्षेत्रापैकी एक तीर्थक्षेत्र आहे. यापूर्वीच्या मराठी चित्रपटामध्ये शेती, शेतकरी, ग्रामीण भागातील जीवनाच दर्शन घडत असे. चित्रपट कांदबरीच्या कथानकावर आधारित असत पण आत्ताच्या चित्रपटाची परिस्थिती बदलली आहे. मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधत ते म्हणाले की, मराठी भाषेला कोणीही धक्का लावू शकत नाही. मराठी भाषा आमची आई, हिंदी भाषा मावशी तर इंग्रजी भाषा मानलेली लाडकी मेहुणी आहे. शब्दांचे महत्त्व व अर्थ विषद करुन आपल्या सदाबहार गीतांनी त्यांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. आपल्या अध्यक्षीय भाषणात उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या सचिव सौ. चैतालीताई काळे म्हणाल्या की, भविष्यात तुम्ही यशस्वी होणार आहेत याची खात्री बाळगा पण यश संपादन करणे हे संपूर्णपणे आपल्या हातात असते याची जाणीव ठेवा. संकटातून मार्ग काढून दुख:तही आपण सुख शोधले पाहिजे कारण आनंदीपणा हे यशाचे खरे रहस्य आहे. आपले आयुष्य खूप छोटे आहे. आपल्याला आवडणारे कला, क्रीडा क्षेत्रातील छंद जोपासण्यासाठी वेळ दिला पाहीजे. आपण यश संपादन केल्यांनातर आपले संस्कार कधीही विसरता कामा नये. या महाविद्यालयातून शिक्षण घेवून यशस्वी व्हा व भविष्यात आपल्या विद्यालयाचे व परिसराचे नाव मोठे करा असा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. सुप्रसिद्ध चित्रपट गायिका सौ. कविता सौदागर यांनीही विविध मराठी, हिंदी चित्रपटातील गाणी आपल्या सुमधुर आवाजात सादर केली. विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुणे व मान्यवराच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्या डॉ. सौ. विजया गुरसळ यांनी केले. अहवाल वाचन कार्याध्यक्ष प्रा. पांडुरंग मोरे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. निर्मला कुलकर्णी व प्रा. विशाल पोटे यांनी केले तर आभार विद्यापीठ प्रतिनिधी श्रीनाथ वाबळे यांनी मानले. याप्रसंगी विद्यार्थी-विद्यार्थिनी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram