केवळ महिलादिनीच महिलांचा आदर मर्यादित नसावा – सौ. पुष्पाताई काळे

जागतिक महिला दिनाच्या दिवशी जगभर महिलांचा आदर सत्कार केला जातो. त्यांच्या त्यागाची तोंडभरून स्तुती केली जाते. विविध समाजिक कार्यक्रमातून महिलांवर स्तुतिसुमने उधळली जातात ही महिलांच्या दृष्टीने खूप आनंदाची व समाधान देणारी गोष्ट आहे. पण जर खरोखर महिलांच्या कष्टाची व त्यागाची कल्पना केली तर केवळ महिलादिनीच महिलांचा आदर मर्यादित नसावा वर्षाचे ३६५ दिवस महिलांचा आदर सन्मान केला पाहिजे असे प्रतिपादन प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. पुष्पाताई काळे यांनी केले. कोपरगाव पंचायत समिती मध्ये एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमात त्या प्रमुख अतिथी म्हणून त्या उपस्थित होत्या याप्रसंगी त्या बोलत होत्या. सौ. पुष्पाताई काळे पुढे म्हणाल्या की, जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमामध्ये ठिकठीकाणी महिलांचा आदरसत्कार केला जातो, या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांच्या कार्याची महती सांगितली जाते ही महिलावर्गासाठी खरोखर सुखावह बाब आहे. सर्वच क्षेत्रात महिला पुरुषाच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून काम करीत आहे. त्यामुळे ज्या महिलेला अबला समजले जायचे ती महिला आज अबला राहिली नसून सबला झाली आहे. समाजातील सर्वच घटकांनी महिलांसाठी काही करायचं असेल तर त्यांना शैक्षणिक, आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास मदत करून महिलांनी देखील महिलांचा योग्य सन्मान कराव असा संदेश दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बालविकास सहाय्यक प्रकल्प अधिकारी सौ. कल्पना वराडे यांनी केले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे, सभापती सौ.अनुसया होन,गटविकास अधिकारी कपिलनाथ कलोडे, जिल्हा परिषद सदस्या सौ. विमल आगवन, सौ. सोनाली रोहमारे, सौ. सोनाली साबळे, नगरसेविका सौ. प्रतिभाताई शिलेदार, सौ. वर्षा गंगुले, सौ. स्वप्नजा वाबळे,पंचायत समिती सदस्या सौ. वर्षा दाणे, सौ. पोर्णिमा जगधने, सदस्य अर्जुनराव काळे, मधुकर टेके, श्रावण आसने, बाळासाहेब राहाणे तसेच पंचायत समितीच्या महिला पदाधिकारी सौ. शशिकला आढाव, सौ. लता भेंडेकर, सौ. पद्मा राजपूत, सौ. शीला खरे, सौ. शीला गोसावी, सौ. मंगल लोणारी सौ. शशिकला दिड्डी आदी मान्यवरांसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram